आनंद पराभूत, नवव्या स्थानी घसरण

By Admin | Updated: December 12, 2015 00:12 IST2015-12-12T00:12:12+5:302015-12-12T00:12:12+5:30

विश्वनाथन आनंदला लंडन बुद्धिबळ क्लासिकच्या सहाव्या फेरीत रशियन ग्रँडमास्टर अलेक्झांडर गिसचूक याच्याकडून पराभव पत्करावा लागला.

Defeats joy, falling ninth place | आनंद पराभूत, नवव्या स्थानी घसरण

आनंद पराभूत, नवव्या स्थानी घसरण

लंडन : विश्वनाथन आनंदला लंडन बुद्धिबळ क्लासिकच्या सहाव्या फेरीत रशियन ग्रँडमास्टर अलेक्झांडर गिसचूक याच्याकडून पराभव पत्करावा लागला.
आनंदच्या पहिल्या तीन फेऱ्या बरोबरीत सुटल्या होत्या. त्यानंतर चौथ्या फेरीत त्याला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे दहा खेळाडूंत सुरू असलेल्या राऊंड रॉबीन स्पर्धेत तो नवव्या स्थानावर फेकला गेला. ग्रिसचूक स्पर्धेतील पहिल्या विजयासह हॉलंडचा अनिस गिरी, अमेरिकेचा हिकारू नकामुरा आणि फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियर लाग्रेव याच्या साथीने प्रत्येकी ४ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे.
आर्मेनियाचा लेवोन आरोनियन, नॉर्वेचा वर्ल्डचॅम्पियन मॅग्नस कार्लसन, इंग्लंडचा मायकल अ‍ॅडम्स आणि अमेरिकेचा फॅबियो कारुआना संयुक्तरीत्या पाचव्या स्थानी आहे. या सर्वांचे प्रत्येकी ३.५ गुण झाले आहेत. आनंदचे २.५ गुण असून तो नवव्या स्थानी आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: Defeats joy, falling ninth place