दादर-खोपोली सायकलिंग स्पर्धा

By Admin | Updated: September 14, 2016 21:39 IST2016-09-14T21:39:17+5:302016-09-14T21:39:17+5:30

मुंबई शहर हौशी सायकलिंग संघटनेतर्फे खुल्या दादर - खोपोली या ७४ किलोमीटर अंतराच्या सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे

Dadar-Khopoli Cycling Tournament | दादर-खोपोली सायकलिंग स्पर्धा

दादर-खोपोली सायकलिंग स्पर्धा

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - मुंबई शहर हौशी सायकलिंग संघटनेतर्फे खुल्या दादर - खोपोली या ७४ किलोमीटर अंतराच्या सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. खुला आणि माऊंटनरिंग बायकिंग (एमटीबी) अशा दोन गटात ही शर्यत २५ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.
 
दादर पोलिस स्टेशनपासून सुरु होणाऱ्या स्पर्धा भवानी शंकर रोड- गोल मंदीर, विर कोतवाल उद्यान, माहेश्वरी उद्यान, प्रियदर्शनी जंक्शन, अण्णाभाऊ साठे उड्डाणपुल, मैत्रीपार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देवनार टेलिफोन फॅक्टरी, सानपाडा, जुईनगर, कोकण भवन, खारघर, कळंबोली जंक्शन, पनवेल शहर उड्डाणपुल, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४, खोपोली असा या शर्यतीचा मार्ग असणार आहे. दादर ते देवनार टेलिफोन फॅक्टरी हा या शर्यतीचा न्यूट्रल झोन असेल.
शर्यतीच्या प्रवेशिका २२ सप्टेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील. या शर्यतीच्या अधिक माहिती आणि प्रवेशिकेसाठी मुंबई जिल्हा सायकलिंग संघटनेशी संपर्क साधवा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
 

Web Title: Dadar-Khopoli Cycling Tournament