शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

टीकाकार नेहमी तलवार घेऊन बसलेले असतात - धोनी

By admin | Updated: October 15, 2015 12:01 IST

टीकाकार नेहमीच हातात तलवार घेऊन बसलेले असतात असा टोला महेंद्रसिंह धोनीने लगावला आहे.

ऑनलाइन लोकमत 

इंदौर, दि. १५ - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ९२ धावांची खेळी करुन संघाला विजय मिळवून देणा-या कर्णधार महेंद्रसिंह धोनी टीकाकारांवर बरसला आहे. टीकाकार नेहमीच हातात तलवार घेऊन बसलेले असतात असे धोनीने म्हटले आहे. 

पराभव आणि खराब फॉर्म यामुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर गेल्या काही दिवसांपासून टीका सुरु होती. अजित आगरकरने धोनीला संघात स्थान देण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यात धोनीने महत्त्वाच्या क्षणी नाबाद ९२ धावांची खेळी केली व भारताला विजय मिळवून दिला. धोनीने मैदानात बॅटने त्याच्या टीकाकारांना उत्तर दिले असून सामन्यानंतर प्रतिक्रिया देतानाही धोनीने टीकाकारांवर निशाणा साधला. मी कधी चुका करीन आणि ते यातून मजा घेतील या प्रतिक्षेत बरीच लोक तलवार घेऊन बसलेले असतात असा टोलाच त्याने लगावला आहे. 

गेल्या दोन वर्षात आमचे आघाडीचे फलंदाज चांगली कामगिरी करत होते, त्यामुळे तळाच्या फलंदाजांवर फारसा दबाव येत नव्हता. कसोटीतून निवृत्ती स्वीकारल्यावर वन डेत मला चौथ्या स्थानावर फलंदाजीला यायचे होते, पण संघाची गरज आणि नवीन खेळाडूंना जास्त संधी मिळावी यासाठी मी पाचव्या स्थानावर फलंदाजीला येतो असे धोनीने सांगितले.  दुस-या सामन्यात आम्हाला विजय मिळाला असला तरी आमच्या कामगिरीत आणखी सुधारणा होण्याची गरज आहे अशी कबुलीही त्याने दिली.