शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

विंडीज संघासमोर ३३१ धावांचे आव्हान

By admin | Updated: October 17, 2014 19:57 IST

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज चौथा एक दिवसीय सामना सुरु असून भारताने विंडीज संघासमोर ३३१ धावांचे आव्हान ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमतधर्मशाला, दि. १७ -  विराट कोहलीच्या झंझावाती १२७ धावांच्या बळावर चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला ३३१ धावांचे आव्हान दिले आहे. भारताने ५० षटकांत सहा गडी गमावत ३३० धावा केल्या असून सुरैशा रैनाने तडाखेबाज अर्धशतक ठोकून कोहलीला साथ दिली. 

चौथ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजचा कप्तान ब्राव्होने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन व अजिंक्य रहाणे या सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. हे दोघेही मोठी धावसंख्या उभारतील असे दिसत असतानाच विंडीजचा गोलंदाज  अँड्रे रसेलने शिखर धवनला (३५ धावा) बाद करत भारताला ७० धावांवर पहिला धक्का दिला. यानंतर अजिंक्य रहाणेने विराट कोहलीच्या साथीने भारताला डाव पुढे नेला. विंडीजचा गोलंदाज सुलेमान बेन याच्या गोलंदाजीवर रहाणे पायचीत झाला. अवघ्या सहा धावा करत भारतीय कप्तान महेंद्र सिंह धोनी धावचीत झाला. तब्बल पाच षटकार आणि तीन चौकार लगावत सुरेश रैनाने फक्त ५८ चेंडूत ७१ धावा केल्याने प्रेक्षक आणि संघाच्या त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या असतानाच रामादिनकडे झेल गेल्याने रैना बाद झाला. भारतीय संघात सर्वात उल्लेखनीय फलंदाजी विराट कोहली केली आहे. तब्बल १३ चौकार व तीन षटकार लगावत कोहलीने आपल्या फलंदाजीचे विराट दर्शन क्रिकेट शौकिनांना घडवले.