शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविणार

By admin | Updated: November 3, 2015 03:55 IST

कर्णधार विराट कोहलीकडून मला मोठा पाठिंबा मिळत आहे. हे केवळ माझ्याबाबतीत नसून संघातील प्रत्येक खेळाडूला त्याचा पाठिंबा मिळतो. त्यामुळे त्याने जो विश्वास माझ्यावर

नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहलीकडून मला मोठा पाठिंबा मिळत आहे. हे केवळ माझ्याबाबतीत नसून संघातील प्रत्येक खेळाडूला त्याचा पाठिंबा मिळतो. त्यामुळे त्याने जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे, तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी उत्सुक आहे, असे भारताचा वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोन याने सांगितले.आॅक्टोबर २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या अ‍ॅरोनला आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. मात्र, आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत नव्याने सुरुवात करताना कर्णधाराने जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरविण्याचा निर्धार अ‍ॅरोनने केला आहे.कर्णधाराचा पाठिंबा कायम चमकदार असतो. विराटचा संघातील प्रत्येक खेळाडूवर विश्वास आहे. कर्णधाराने जो विश्वास दाखवला आहे, त्यामुळे माझ्या आत्मविश्वासात वाढ झाली असून, येणाऱ्या द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मी कर्णधाराचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवेल, असे अ‍ॅरोनने सांगितले. आफ्रिकेचा एबी डिव्हीलियर्स सध्या तुफान फॉर्ममध्ये असून, कर्णधार हाशिम आमलाही कोणत्याही वेळेत फॉर्ममध्ये येऊ शकतो. त्यामुळे अशा कसलेल्या फलंदाजांसमोर मारा करण्याचे दडपण असेल का? यावर अ‍ॅरोन म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी कोणतीही विशेष तयारी करीत नाहीए. याउलट माझा भर माझा पाया भक्कम करण्यावर आहे. कारण ही गोष्ट माझ्या नियंत्रणात असून हे साध्य झाल्यास मी नक्की यशस्वी होईल, याची खात्री आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी महत्त्वाची असून, सध्या याकडेच माझे पूर्ण लक्ष असल्याचे अ‍ॅरोनने सांगितले.(वृत्तसंस्था)आगामी द. आफ्रिकाविरुद्ध मालिकेसाठी मी उत्सुक आहे. श्रीलंकेविरुद्ध मी केवळ एक सामना खेळलो आणि हा सामना चांगला झाला नाही. त्या सामन्यात केवळ दोन बळी घेण्यात यश आले. सध्या रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करीत असून बांगलादेशविरुद्ध भारत ‘अ’कडूनही माझी कामगिरी चांगली झाली. त्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला आहे.- वरुण अ‍ॅरोन