शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाताचा ‘सूर्य’ तळपला

By admin | Updated: April 9, 2015 01:17 IST

आयपीएलचा थरार काय असतो हे पहिल्याच सामन्यात पाहायला मिळाले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात यजमान कोलकाता

कोलकाता : आयपीएलचा थरार काय असतो हे पहिल्याच सामन्यात पाहायला मिळाले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात यजमान कोलकाता नाइट रायडर्सने बलाढ्य मुंबई इंडियन्सचे तगडे आव्हान ७ विकेट्सने परतावले. विशेष म्हणजे मुंबईकर सुर्यकुमार यादवने अखेरपर्यंत फटकेबाजी करताना कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. कर्णधार गौतम गंभीरने ४३ चेंडूत ५७ धावांचा तडाखा देताना संघाच्या विजयाचा पाया रचला. या दोघांमुळे पहिल्या डावात रोहित शर्माने केलेली नाबाद ९८ धावांची दणकेबाज खेळी झाकोळली गेली.मुंबई इंडियन्सने कर्णधार शर्माच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर यजमानांना १६९ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला अँडरसनने धक्का देताना सलामीवीर रॉबिन उत्थप्पाला बाद केले. मात्र मनिष पांड्येने गंभीर सोबत किल्ला लढवताना दुसऱ्या विकेट्साठी ८५ धावांची भागीदारी केली. यावेळी दबावाखाली आलेल्या मुंबईला दिलासा देत हरभजन सिंगने पांड्येला बाद केले. पांड्येने २ चौकार व ३ षटकारांसह २४ चेंडूत ४० धावा फटकावल्या. यावेळी मुंबई पुनरागमन करणार असे दिसत असतानाच सुर्यकुमारने तुफान फटकेबाजी करताना सामन्याचा निकाल स्पष्ट केला. गंभीर बाद झाल्यानंतर कोणतेही दडपण न आणला सुर्यकुमारने आपला दांडपट्टा चालू ठेवला. गंभीरने ७ चौकार व एका षटकाराने आपली खेळी सजवली. तर शेवटपर्यंत टिकून राहताना सुर्यकुमारने २० चेंडूत केवळ १ चौकार मारत तब्बल ५ षटकारांचा नजराणा पेश केला. मुंबईकडून कोरे अँडरसन, जसप्रीत बुमराह आणि हरभजन सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. (क्रीडा प्रतिनिधी)