शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सिंग इंडियाचा ‘नवोदय’ होणार

By admin | Updated: September 11, 2014 01:48 IST

राष्ट्रीय महासंघावर बंदी असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून नाचक्कीचा सामना करीत असलेल्या भारतीय बॉक्सिंगचा उद्या गुरुवारी ‘नवोदय’होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई : राष्ट्रीय महासंघावर बंदी असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून नाचक्कीचा सामना करीत असलेल्या भारतीय बॉक्सिंगचा उद्या गुरुवारी ‘नवोदय’होण्याची चिन्हे आहेत. या खेळाचे संचालन करणाऱ्या बॉक्सिंग इंडियाची निवडणूक होत आहे.आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेद्वारा (आयबा) मान्यताप्राप्त बॉक्सिंग इंडिया निवडणुकीचे आयोजन करीत आहे, पण त्याआधीच निवडणुकीत अफरातफर होत असल्याचा आरोपही झाला. निवडणूक आटोपल्यानंतर जे पदाधिकारी काम पाहतील त्यांच्या गटाला बॉक्सिंग इंडिया म्हणून ओळखले जाईल. आधी ही संघटना भारतीय अ‍ॅमेच्युअर बॉक्सिंग महासंघ (आयएबीएफ) या नावे ओळखली जायची. या संघटनेवर डिसेंबर २०१२ पासून निलंबनाची तलवार लटकत राहिली तसेच यंदा सुरुवातीला बरखास्त करण्यात आले. आयबाचे पर्यवेक्षक कायदे व्यवस्थापक क्लायडोन गाई आणि विश्व संस्थेत भारताचे प्रतिनिधी असलेले किशन नर्सी हे संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवतील. दोघेही आपला अहवाल सादर करणार असून त्यानंतरच बॉक्सिंग इंडियाला अधिकृत मानले जाईल. मतदानात कुठलीही कसर शिल्लक राहू नये यासाठी संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओचित्रण होणार आहे. बॉक्सिंग इंडियाचे सदस्य उदित सेठ म्हणाले, ‘पारदर्शीपणा राखण्यासाठी जे जे उपाय असतील ते सर्व केले जातील.’ बॉक्सिंग इंडिया हा माजी प्रशासक आणि कॉर्पोरेट समूहाचा गट आहे. यात बॉक्सिंगला दीर्घकाळपासून राजाश्रय देणारे संदीप जाजोदिया यांचा समावेश आहे. अध्यक्षपदासाठी कुणी दुसरा उमेदवार नसल्याने जाजोदिया हे निर्विरोध अध्यक्ष बनले. त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा उद्या होईल. ही निवडणूक ९ जुलै रोजी होणार होती. पण ती टाळण्यात आली. दरम्यान अनेक राज्य संघटनांनी बॉक्सिंग इंडियाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह लावले. बॉक्सिंग इंडियाने क्रीडा मंत्रालय आणि आयोएला पर्यवेक्षक पाठविण्याची विनंती केली पण आयओएने विनंती फेटाळली तर मंत्रालयाने उत्तर दिले नाही. मतदान सुरळीत पार पडले आणि संपूर्ण प्रक्रिया समाधानकारक असल्याची आयबाच्या पर्यवेक्षकांची खात्री पटली तर बॉक्सिंग इंडियाला आयबाकडून अस्थायी मान्यता मिळेल. (वृत्तसंस्था)