शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बे जिमला धक्का

By admin | Updated: June 11, 2015 00:49 IST

एमएलडब्लूबी संघाने तीन लढतींपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात बलाढ्य बॉम्बे जिमखाना ‘ब’ संघाचा २-१ असा पाडाव करून मोतीराम स्मृती चषक

मुंबई : एमएलडब्लूबी संघाने तीन लढतींपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात बलाढ्य बॉम्बे जिमखाना ‘ब’ संघाचा २-१ असा पाडाव करून मोतीराम स्मृती चषक बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार आगेकूच केली. अन्य एका सामन्यात अनुभवी खार जिमखाना ‘ब’ संघाने चेंबूर जिमखानाचा २-१ असा पराभव केला.क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एमएलडब्लूबी संघाच्या अमोल हिंदळकर - मनीष कुमार या जोडीने पहिली लढत जतीन अगरवाल - नेवल कुमार यांच्याविरुद्ध २१-२३, २१-१६, १७-२१ अशी गमावल्यानंतरही एमएलडब्ल्यूबी संघाने सलग दोन लढतीत बाजी मारुन सामना जिंकला. यानंतर अमोलने नेवलचा २१-१५, २१-१६ असा पाडाव केला. तर सोमनाथ सोनावणे - ओवेस शेख यांनी गौतम आश्रा - जिमी मास्टर यांचा २१-१९, १५-२१, २१-१९ असा पाडाव करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.खार जिमखाना ‘ब’ संघाने आपल्या लौकिकानुसार बाजी मारताना चेंबूर जिमखानाचा २-१ असा झुंजार पाडाव केला. आदित्य छाब्रिया - पुलकीत दालमिया यांनी अमीत शर्मा - क्रिष्णा अगरवाल यांच्याविरुध १६-२१, २१-७, १९-२१ अशी हार पत्करल्याने खार जिम पिछाडीवर पडले. यानंतर मात्र त्यांनी जबरदस्त पुनरागमन करताना झुंजार विजय मिळवला. जेहान आशरने क्रिष्णाचा २१-१३, २१-१३ असा धुव्वा उडवून खार संघाला बरोबरी साधून दिली. तर यानंतरच्या निर्णायक लढतीत अंकित मुनील - विजय मिरपुरी यांनी अनुराग राव - एस. देशपांडे यांचा २१-१०, २१-१८ असा धुव्वा उडवून खार जिमखानाला विजयी केले.एनएससीआय ‘अ’ संघाने यजमान सीसीआय ‘क’ संघाचा २-० असा फडशा पाडला. प्रतिक-निखिल यांनी राज - केतन यांचा २१-१७, २१-१८ असा पराभव केल्यानंतर मयुर बी.ने झौश एस. याचा २१-१०, २१-१० असा पराभव करुन संघाला विजयी केले.