त्या विधानामुळे गावसकर अडचणीत

By Admin | Updated: January 10, 2015 23:43 IST2015-01-10T23:43:23+5:302015-01-10T23:43:23+5:30

माजी कर्णधार सुनील गावसकर चांगलेच भडकले आणि समालोचन करताना त्यांनी चक्क ‘लाज वाटू द्या’, असे म्हटले़ त्यामुळे हा माजी खेळाडू अडचणीत येण्याची शक्यता आहे़

Because of that statement, Gavaskar is in trouble | त्या विधानामुळे गावसकर अडचणीत

त्या विधानामुळे गावसकर अडचणीत

सिडनी : भारताविरुद्ध झालेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत आॅस्ट्रेलियन खेळाडंूनी केलेल्या एका अपिलावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर चांगलेच भडकले आणि समालोचन करताना त्यांनी चक्क ‘लाज वाटू द्या’, असे म्हटले़ त्यामुळे हा माजी खेळाडू अडचणीत येण्याची शक्यता आहे़
डावाच्या ७६व्या षटकात नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर चेंडू आऱ अश्विनच्या बॅटला लागून सिली पॉइंटकडे गेला़ हा चेंडू टप्पा पडल्यानंतर शॉन मार्शच्या हातात विसावला़ मात्र, तरीही आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केले़ तेव्हा पंच कुमार धर्मसेना याने हे अपील फेटाळून लावले़
मात्र, तरीही खेळाडूंनी अपील करणे सुरूच ठेवले़ अखेर धर्मसेना यांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितली़, तेव्हा आश्विन नाबाद असल्याचे स्पष्ट झाले़ तेव्हा गावसकरांनी खेळाडंूच्या अपील करण्यावर टीका करताना अपशब्द वापरला़ (वृत्तसंस्था)

Web Title: Because of that statement, Gavaskar is in trouble