शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळू द्या : श्रीनिवासन

By admin | Updated: November 22, 2014 04:13 IST

न्या. मुकुल मुद्गल समितीने आयपीएल-६ मधील फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपातून दोषमुक्त केल्यामुळे मला कामकाज सांभाळण्याची परवानगी देण्यास हरकत नाही

नवी दिल्ली : आयपीएलमधील फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या कामकाजापासून दूर असलेले एन. श्रीनिवासन यांनी आज, शुक्रवारी सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर करीत अध्यक्षपदाचे कामकाज पाहण्याची परवानगी मागितली आहे.न्या. मुकुल मुद्गल समितीने आयपीएल-६ मधील फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपातून दोषमुक्त केल्यामुळे मला कामकाज सांभाळण्याची परवानगी देण्यास हरकत नाही, असा युक्तिवाद श्रींनी केला. आयसीसीचेदेखील अध्यक्ष असलेले श्रीनिवासन पुढे म्हणाले, ‘मुदगल समितीने मला दोषमुक्त केल्याने आता बोर्डाच्या प्रमुखपदाचा कारभार पाहण्याची परवानगी दिली जावी.’ कोर्टाने समितीचा तपास पूर्ण होईपर्यंत अध्यक्षपदापासून दूर राहण्याचे निर्देश त्यांना दिले होते. तेव्हापासून ते बोर्डाच्या कामकाजापासून दूर आहेत. बोर्डाचे चार अधिकारी, तसेच काही खेळाडू संशयास्पद घडामोडीत सामील असल्याची माहिती असताना बोर्डाने त्यांच्यावर कुठलीही कारवाई का केली नाही? असा सवाल मुद्गल समितीच्या अहवालात उपस्थित करण्यात आला होता. त्याविषयी श्रींनी एक शपथपत्र दाखल केले. त्यात म्हटले आहे की, ‘अहवालात उल्लेख असलेल्या तिन्ही खेळाडूंना तोंडी समज दिली होती. त्यावेळी बोर्डाचे अध्यक्ष असलेले अ‍ॅड. शशांक मनोहर यांनीदेखील खेळाडूंच्या स्पष्टीकरणावर समाधान व्यक्त केले होते.’(वृत्तसंस्था)