शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयने घटना बदलावी

By admin | Updated: May 4, 2016 04:04 IST

बीसीसीआयची सध्याची घटना पारदर्शी, निष्पक्ष आणि जबाबदार नसल्यामुळे या तिन्ही गोष्टी अंगीकारण्यासाठी घटनाबदल करावा. घटनाबदल करण्यास बीसीसीआय स्वत: सक्षम आहे

नवी दिल्ली : बीसीसीआयची सध्याची घटना पारदर्शी, निष्पक्ष आणि जबाबदार नसल्यामुळे या तिन्ही गोष्टी अंगीकारण्यासाठी घटनाबदल करावा. घटनाबदल करण्यास बीसीसीआय स्वत: सक्षम आहे. घटनेत बदल केल्यानंतरच उपरोक्त तिन्ही उद्दिष्टे साध्य होऊ शकतात, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे.मुख्य न्यायमूर्ती तीरथसिंह ठाकूर आणि न्या. एफ. एम. कलिफुल्ला यांच्या पीठाने हे निरीक्षण नोंदविताना ‘बीसीसीआयचे सध्याचे संविधान पारदर्शीपणा, निष्पक्षपणा आणि जबाबदारीची जाणीव ही तिन्ही मूल्ये राबविण्यात अपयशी ठरले असून, सध्याच्या घटनेत बदल करण्याशिवाय तिन्ही गोष्टींचा स्वीकार शक्य नाही,’ असे नमूद केले.पीठाने न्यायालय मित्र नेमलेले ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी क्रिकेट बोर्ड सार्वजनिक काम करीत असल्याने बोर्डाने ही तिन्ही मूल्ये राबवायला हवीत; ती राबविण्यात अपयशी ठरलेल्या बीसीसीआयला अवैध ठरविण्यात यावे, असे मत व्यक्त करतानाच पीठाने हे निरीक्षण नोंदविले. पीठाचे मत असे, की तुम्ही (बीसीसीआय) सार्वजनिक काम करता; मात्र खासगी दर्जादेखील कायम ठेवू इच्छिता. तुमचे काम सार्वजनिक असेल, तर खासगी दर्जा गमवावा लागेल. देशासाठी राष्ट्रीय संघ निवडणारे बोर्ड खासगी संस्था असूच शकत नाही. तुमचा हा सार्वजनिक उपक्रम आहे.’पायाभूत बदलाच्या शिफारशींचे समर्थन करीत सुब्रमण्यम यांनी बीसीसीआयने सर्वाजनिक हित जोपासले असते, तर या शिफारशींची गरजही भासली नसती, असे कोर्टापुढे सांगितले. संस्थेचे पावित्र्य कायम राखण्यासाठी संवैधानिक मूल्ये स्वीकारावीच लागतील. न्या. लोढा समितीच्या शिफारशी तुमच्या हिताच्याच आहेत. या शिफारशी लागू केल्यास बीसीसीआयची विश्वासार्हता वाढणार आहे. पीठाने सुब्रमण्यम यांना प्रश्न विचारला, की तुम्ही दोन्ही टोके एकत्र कशी आणू शकता? कारण ज्या राज्यांना आधी मतदानाच अधिकार होता, त्यांचा अधिकार जाणार आणि ज्यांना नव्हता त्यांना मिळणार. यावर सुब्रमण्यम म्हणाले, ‘‘प्रत्येक राज्याला बरोबरीची संधी मिळायला हवी. आयपीएलच्या संचालन परिषदेत आणखी पारदर्शीपणा आणण्यासाठी संघांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात यावे.’’सट्टेबाजीला कायदेशीर वैधता देण्याचे सुब्रमण्यम यांनी समर्थन केले आहे. यावर पीठाने बीसीसीआयकडून उत्तर मागितले. बोर्डाकडून युक्तिवाद करणारे अ‍ॅड. के. के. वेणुगोपाल म्हणाले, ‘‘सट्टेबाजी वैध करण्यासाठी कायदा पारित करावा लागेल. बीसीसीआय याच्याशी सहमत नाही. सट्टेबाजीसंदर्भात प्रत्येक राज्याचा वेगळा कायदा आहे. व्यावहारिकदृष्ट्या हे काम अडचणीचे आहे.’’ (वृत्तसंस्था)