बीसीसीआयकडून टीम इंडियाला २ कोटींचे इनाम जाहीर

By Admin | Updated: December 8, 2015 16:23 IST2015-12-08T16:23:30+5:302015-12-08T16:23:30+5:30

नुकत्या संपलेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर ३-० असा दणदणीत विजय मिळवल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने टीम इंडियाला २ कोटी रुपये रोख रक्कमेचे इनाम जाहीर केले आहे.

BCCI announces Rs. 2 crore reward to Team India | बीसीसीआयकडून टीम इंडियाला २ कोटींचे इनाम जाहीर

बीसीसीआयकडून टीम इंडियाला २ कोटींचे इनाम जाहीर

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ८ - नुकत्या संपलेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर ३-० असा दणदणीत विजय मिळवल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने टीम इंडियाला २ कोटी रुपये रोख रक्कमेचे इनाम जाहीर केले आहे. शेवटच्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला ३३७ धावांनी पराभूत करुन भारताने ३-० ने मालिका जिंकली. 

या विजयामुळे भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत थेट दुस-या स्थानावर मजल मारली आहे. भारताने पहिली मोहाली कसोटी१०८ तर, तिसरी नागपूर कसोटी१२४ धावांनी जिंकली होती. बीसीसीआयने टि्वटरवरुन इनामी रक्कमेची घोषणा केली. मालिका गमावूनही दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. 

Web Title: BCCI announces Rs. 2 crore reward to Team India