शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

बास्केटबॉल १

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST

या ज्येष्ठ संघटकांनी महाविद्यालयीन खेळाडूंचा प्रतिसाद कमी असल्याचीही खंत व्यक्त केली. महाविद्यालयीन पातळीवर खेळाडूंचा प्रतिसाद फारच कमी आहे. शालेय स्पर्धेत ५0 पेक्षा जास्त संघ सहभागी होतात; परंतु आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत कसेबसे आठच संघ सहभागी होतात, असे त्यांनी सांगितले. मनजित आणि कड यांनी बास्केटबॉल खेळाला मीडिया आणि स्पॉन्सर्सचे पाठबळ महत्त्वाचे असल्याचे म्हटले. कोणताही खेळ मीडियाच्या पाठबळाशिवाय लोकप्रिय होऊ शकत नाही. लोकमत समूहातर्फे स्थानिक खेळाडूंना नेहमीच पाठबळ असते. युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठाची गरज असते आणि लोकमत समूहाने औरंगाबाद स्पोर्टस् फेस्टिव्हलचे आयोजन करून खेळाडूंना आवश्यक असलेले व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे खेळाडूंना प्रेरणा मिळून त्यांचा आत्मविश्वासही उंचावला आहे. याशिवाय आम्हाला आमच्या प्रतिभावान ब

या ज्येष्ठ संघटकांनी महाविद्यालयीन खेळाडूंचा प्रतिसाद कमी असल्याचीही खंत व्यक्त केली. महाविद्यालयीन पातळीवर खेळाडूंचा प्रतिसाद फारच कमी आहे. शालेय स्पर्धेत ५0 पेक्षा जास्त संघ सहभागी होतात; परंतु आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत कसेबसे आठच संघ सहभागी होतात, असे त्यांनी सांगितले. मनजित आणि कड यांनी बास्केटबॉल खेळाला मीडिया आणि स्पॉन्सर्सचे पाठबळ महत्त्वाचे असल्याचे म्हटले. कोणताही खेळ मीडियाच्या पाठबळाशिवाय लोकप्रिय होऊ शकत नाही. लोकमत समूहातर्फे स्थानिक खेळाडूंना नेहमीच पाठबळ असते. युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठाची गरज असते आणि लोकमत समूहाने औरंगाबाद स्पोर्टस् फेस्टिव्हलचे आयोजन करून खेळाडूंना आवश्यक असलेले व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे खेळाडूंना प्रेरणा मिळून त्यांचा आत्मविश्वासही उंचावला आहे. याशिवाय आम्हाला आमच्या प्रतिभावान बास्केटबॉलपटूंसाठी स्पॉन्सर्सचीही गरज आहे, असे त्यांना वाटते. औरंगाबादेत ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी आशाही या बास्केटबॉल संघटकांना वाटते. ते म्हणाले, शहरात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. त्यात अनिरुद्ध पांडे, अवनी देशमुख, स्नेहजित कौर दरोगा, विद्या गुजराती, मयुरी बोरुडे, नवेली देशमुख आणि तन्वी पारेख यांचा समावेश आहे. आगामी स्पर्धेत नवीन गुणवत्ता पुढे येईल अशी आम्हाला आशा आहे.
बास्केटबॉल संघटनेसमोर कठीण आव्हान आहे; परंतु या आकर्षक आणि वेगवान खेळाकडे ते आणखी नवीन चाहते मिळवतील अशी आशा आहे. या प्रसंगी मनजितसिंग दरोगा व गणेश कड यांच्यासह संदीप ढंगारे, सय्यद रफिक, रौनकसिंग, मीनाक्षी मुलिया, प्रशांत बुरांडे, शिवाजी शिंदे, विजय पिंपळे आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)