शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

बजाज क्रीडा महोत्सव

By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST

के.सी. बजाज शालेय क्रीडा महोत्सव २० पासून

के.सी. बजाज शालेय क्रीडा महोत्सव २० पासून
व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग, नेमबाजी, बुद्धिबळ, तिरंदाजीचे आयोजन
नागपूर : सिंधू शिक्षण संस्थेचे संस्थापक के. सी. बजाज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित शालेय क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ यंदा २० ऑगस्टपासून जरिपटका येथील महात्मा गांधी सेन्टेनियल सिंधू हायस्कूल मैदानावर होणार आहे. यंदा आयोजनाचे हे नववे वर्ष असून मुलामुलींसाठी आयोजित ता महोत्सवात व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग, नेमबाजी, बुद्धिबळ आणि तिरंदाजी स्पर्धा होतील, अशी माहिती संस्थेचे सचिव दीपक बजाज यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
यंदा व्हॉलिबॉलमध्ये मुलांचे ३२ आणि मुलींचे १६, बास्केटबॉलमध्ये मुलांचे १६ आणि मुलींचे आठ संघ सहभागी होत असून स्केटिंग प्रकारात ९०० तसेच बुद्धिबळात २५० स्पर्धकांचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आणि खेळाडूंना चषक तसेच उत्कृष्ट खेळाडूंनाही चषक देण्यात येईल. याशिवाय उत्कृष्ट प्रशिक्षकाला देखील गौरविण्याची परंपरा कायम राहणार आहे. या महोत्सवात एकाच मैदानावर शंभर शाळांमधून तीन हजारावर सहभागी स्पर्धकांना दररोज अल्पोपहार आणि इतर सुविधा आयोजन समितीमार्फत पुरविण्यात येणार आहेत. शासनाच्या शालेय क्रीडा आयोजनापूर्वी हा महोत्सव होत असल्याने खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरण मिळण्यास लाभ होतो, असे बजाज म्हणाले.
पुढील वर्षी पासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोचचा देखील आम्ही महोत्सवादरम्यान सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवाची सांगता आणि पुरस्कार वितरण २ सप्टेंबर रोजी होईल. त्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडूला पाहुणा म्हणून बोलविण्याची इच्छा बजाज यांनी व्यक्त केली.
पत्रपरिषदेला संस्थेच्या अध्यक्ष वीणा बजाज, हरकिशन राजपाल, के. एल. बजाज, प्रजापती बजाज, खुबचंद प्रितमानी, टेकचंद ग्यानचंदानी, ज्योती दुहिलानी, राजकुमारी मेघराजानी आदी उपस्थित होते.(क्रीडा प्रतिनिधी)