शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बच्चन कुटुंब रंगले खेळात!

By admin | Updated: July 18, 2014 02:16 IST

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची ओळख एकेकाळी ‘अँग्री यंग मॅन’ अशी होती. कुणी त्यांना मेगास्टार म्हणतात. अख्खे बच्चन कुटुंबीय क्रीडाचाहते आहे

नवी दिल्ली : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची ओळख एकेकाळी ‘अँग्री यंग मॅन’ अशी होती. कुणी त्यांना मेगास्टार म्हणतात. अख्खे बच्चन कुटुंबीय क्रीडाचाहते आहे. खेळाचा आनंद लुटताना हे कुटुंब अगदी रमून जाते. छोट्या पडद्यावर अमिताभ आता ‘युद्ध’ या सिरियलद्वारे येत आहेत. ही सिरियल लाँच होण्याआधी अमिताभ यांनी ब्राझीलला जाऊन फिफा फुटबॉल विश्वचषकातील अंतिम सामन्याचा आनंद लुटला.अमिताभ यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांच्या चेहऱ्यावरील हास्य कुटुंबाच्या क्रीडाप्रेमाची साक्ष दर्शवीत होते. लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक खा. विजय दर्डा यांच्याशी गुरुवारी अनौपचारिक चर्चेच्या वेळी बच्चन कुटुंबाने काही अनुभव शेअर केले. या वेळी जया बच्चन म्हणाल्या, की फुटबॉल आणि कबड्डी हे खेळ आमच्या कुटुंबात एकाच वेळी नांदतात. ‘अमिताभ नुकतेच विश्वचषकाचा अंतिम सामना पाहून परतले, तर पुत्र अभिषेक याने प्रो-कबड्डी लीगमधून जयपूर फ्रँचायझी संघ खरेदी केला,’ असे त्यांनी सांगितले.७१ वर्षांच्या अमिताभ यांनी या विश्वचषकात ब्राझीलची जी दाणादाण झाली, त्याबद्दल टिष्ट्वटरवर नाराजीदेखील व्यक्त केली होती. आपला फेव्हरिट संघ इतका कसा कमकुवत खेळू शकतो, याबद्दल ते आश्चर्यचकित झाले. उपांत्य सामन्यात जर्मनीकडून एकतर्फी पराभव झाल्यानंतर ब्राझीलला तिसऱ्या स्थानाच्या लढतीत हॉलंडनेदेखील धूळ चारली होती. अमिताभ यांनी या पराभवाबद्दल टिष्ट्वट केले..., ‘‘कोपाकाबाना बीच फेस्टिव्हलमधून परतलो तर काय, ब्राझील पुन्हा पराभूत झाला होता! मी कमालीचा नर्व्हस आणि उदास झालो! या संघाला अखेर झाले तरी काय, असा प्रश्न पडला!!’’ ब्राझीलच्या कमकुवत कामगिरीमागील कारणही अमिताभ यांनी शोधले. ते म्हणतात, ‘ब्राझीलकडे एकाहून एक दिग्गज खेळाडू होते हे खरे असले तरी, सांघिक कामगिरीत ते अपयशी ठरले. वैयक्तिक कामगिरीत एकेक खेळाडू कितीही श्रेष्ठ असला तरी संघ म्हणून खेळताना कोचची गरज असते. एका माळेत बांधण्याची किमया कोचला करावीच लागते.’आता ज्युनियर बच्चन अर्थात अभिषेकने मनोगत व्यक्त करण्याची वेळ आली आहे. प्रो-कबड्डीचा थरार एकदा रंगात आला की, अभिषेकदेखील स्वत:चे मनोगत व्यक्त करणार!! (विशेष प्रतिनिधी)