शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी संयम राखावा : डॅरेन लेहमन

By admin | Updated: January 20, 2015 00:23 IST

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मासोबत झालेल्या वादानंतर डेव्हिड वॉर्नरला दंडाची शिक्षा सुनावण्यात आली

मेलबोर्न : भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मासोबत झालेल्या वादानंतर डेव्हिड वॉर्नरला दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याबाबत प्रतिक्रिया देताना आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी आॅस्ट्रेलियन खेळाडूंवर टीका केली. खेळताना संयम राखण्याचा सल्ला लेहमन यांनी आॅस्ट्रेलियन खेळाडूंना दिला आहे.लेहमन यांनी खेळाडूंना ताकीद देताना म्हटले आहे, की, मैदानावर खेळताना संयम राखणे आवश्यक आहे. आॅस्ट्रेलियन खेळाडूंना कुणी डिवचले, तरच त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होते.’आयसीसीने भारताच्या रोहित शर्मासोबत झालेल्या वादामुळे वॉर्नरला सामनाशुल्काच्या ५० टक्के रकमेचा दंड ठोठावला.लेहमन म्हणाले, ‘‘ही चांगली बाब नाही. आयसीसीने याची दखल घेतली असून, कारवाई केली आहे. सामन्यानंतर या सर्व परिस्थितीबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. डेव्हिडने त्याच्यावर दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले. सामना शुल्काच्या ५० टक्के रकमेची दंड म्हणून कपात करण्यात येणार आहे.’’आम्ही त्याच्यासोबत चर्चा करू. प्रतिस्पर्धी संघासोबत चर्चा करताना प्रकरण मिटत नसेल तर ते अडचणीचे नाही; पण आपण नेहमी खेळावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. खेळाचा आदर करताना संयम राखणे आवश्यक आहे. मर्यादा ओलांडणे चुकीचे आहे.’’संथ षटकगतीसाठी झालेल्या विलंबाबाबत बोलताना लेहमन म्हणाले, ‘‘प्रत्येक संघाला साडेतीन तास मिळतात. आम्हाला ३ तास ५६ मिनिटे लागली. आम्ही अनेक चेंडू वाईड टाकले आणि षटकादरम्यान आमची गती संथ होती. आम्हाला त्यावर काम करणे आवश्यक आहे. संघातील खेळाडूंसोबत याबाबत चर्चा केली. पुन्हा अशी चूक होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल. नियोजित वेळेत सामना संपणे आवश्यक आहे.’’ (वृत्तसंस्था)क्रिकेटसाठी हे योग्य नाही. क्रिकेट खेळताना मर्यादा ओलांडणे चुकीचे आहे. डेव्हिड आक्रमक खेळाडू असून, त्याला लवकर राग येतो. आम्हाला याची कल्पना आहे. डेव्हिड चांगला खेळाडू असून मैदानावर त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. -डॅरेन लेहमन