शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या दिवशी आनंदचे वर्चस्व; पण पोडीयमपासून दूरच

By admin | Updated: October 13, 2015 23:56 IST

माजी विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद याने विश्व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत अखेरच्या दिवशी ५ फेऱ्यांमध्ये ४ गुणांची कमाई केली; पण पहिल्या दोन दिवसांतील निराशाजनक कामगिरीमुळे या भारतीय

बर्लिन : माजी विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद याने विश्व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत अखेरच्या दिवशी ५ फेऱ्यांमध्ये ४ गुणांची कमाई केली; पण पहिल्या दोन दिवसांतील निराशाजनक कामगिरीमुळे या भारतीय स्टार बुद्धिबळपटूला स्पर्धेत २५व्या स्थानावर समाधान मानावे लागले. या तीन दिवसीय स्पर्धेत मॅग्नस कार्लसन आपले जेतेपद राखण्यात यशस्वी ठरला. नॉर्वेच्या या खेळाडूने चमकदार कामगिरी केली. १५ फेऱ्यांपैकी केवळ एका फेरीत हा खेळाडू अडचणीत असल्याचे दिसून आले. त्याने ८ विजय व ७ अनिर्णीत निकालांसह एकूण ११.५ गुणांची कमाई केली. रशियाचा इयान नोपोमनियाचतची, अझरबेझानचा तैमूर रादजाबोव आणि क्युबाचा लिनियर डोमिनगेज अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या स्थानी राहिले. त्यांच्या खात्यावर प्रत्येकी १०.५ गुणांची नोंद होती. आनंदच्या खात्यावर ९.५ गुण होते. पहिल्या दोन दिवसांत त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने पहिल्या दिवशी २.५, तर दुसऱ्या दिवशी ३ गुण मिळविले. पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या आनंदने अखेरच्या दिवशी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात केली. त्याने पोलंडचा ग्रँडमास्टर बार्तोस सोको आणि मातेस बार्तल त्याचप्रमाणे अर्मेनियाचा तिगरामन पेट्रोसियान यांचा पराभव केला, तर रशियाचा इलदार खैरुलिन व युक्रेनचा युरी क्रिवारुचको यांच्याविरुद्धच्या लढती बरोबरीत सोडवल्या. भारताच्या विदित संतोष गुजराथीने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने रॅपिड रेटिंगमध्ये १०५ गुण मिळविले. त्याने या स्पर्धेत ९ गुण मिळविले असून, तो आनंदपेक्षा एका स्थानाने पिछाडीवर आहे. विदितने अखेरच्या दिवशी आघाडीचा बुद्धिबळपटू लेव्होन आरोनियनला बरोबरीत रोखले. बी. अधिबानने छाप पाडताना ९ गुणांची कमाई केली. त्याने दुसऱ्या दिवशी रशियाच्या दिमित्र आंद्रेकिनचा पराभव केला, तर अखेरच्या दिवशी विश्व चॅम्पियन व माजी चॅलेंजर बॉरिस गेलफंडला बरोबरीत रोखले. अन्य भारतीय बुद्धिबळपटूंमध्ये शशिकिरण (८ गुण), एस.पी. सेतुरामन (७.५ गुण) आणि सूर्यशेखर गांगुली (७ गुण) यांनीही चांगली कामगिरी केली. आता विश्व ब्लिट््झ चॅम्पियनशिप खेळल्या जाणार असून, या ५ दिवसीय स्पर्धेत सर्व स्टार खेळाडू सहभागी होणार आहेत. पोकर्स स्टार्स बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद पटकावल्यामुळे ग्रॅण्डमास्टर पी. हरिकृष्ण या २१ फेऱ्यांच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. (वृत्तसंस्था)०००