शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

शपथपत्राचे अस्त्र

By admin | Updated: February 20, 2016 02:40 IST

सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्या. लोढा समितीच्या शिफारशींमुळे अडचणीत आलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाने(बीसीसीआय) या शिफारशी लागू करण्यात येणाऱ्या अडचणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्या. लोढा समितीच्या शिफारशींमुळे अडचणीत आलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाने(बीसीसीआय) या शिफारशी लागू करण्यात येणाऱ्या अडचणी तसेच दूरगामी परिणामांचा पाढा वाचणारे शपथपत्र न्यायालयात दाखल करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.बीसीसीआयने मुख्यालयात आज शुक्रवारी सर्वोच्य न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीच्या शिफारशींवर विचार करण्यासाठी बोर्डाची विशेष आमसभा बोलावली होती. क्रिकेट प्रशासनात आमूलाग्र बदल आणि सुधारणा घडवून आणण्यात कुठल्या अडचणी आहेत याची माहिती देणारे शपथपत्र सादर करण्याचा निर्णय आमसभेने घेतला. बीसीसीआयच्यावतीने सचिव अनुराग ठाकूर हे शपथपत्र दाखल करतील. न्यायालयाने या शिफारशींवर आपले म्हणणे मांडण्यासाठी बोर्डाला ३ मार्चपर्यंत वेळ दिला आहे. लोढा समितीने आपल्या शिफारशींमध्ये बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांचे वय ७० वर्षांपर्यंत कायम करणे, एक राज्य एक संघटना व एकच मत तसेच मंत्री आणि अधिकाऱ्यांना बोर्डात पदाधिकारी बनण्यापासून मज्जाव करण्यासारख्या अनेक सूचना केल्या आहेत.यावर आयपीएल चेअरमन अ सलेले बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले,‘३ मार्चपूर्वी आम्ही सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करू. बोर्डाच्यावतीने के.के. वेणुगोपाल बाजू मांडतील.’ छत्तीसगडला पूर्णकालीन सदस्य बनविण्यात आले असून हा संघ रणजी करंडकात मध्य विभागात खेळेल. २०१६-१७ च्या रणजी मोसमात छत्तीसगडला २८ वा संघ म्हणून मान्यता असेल.२०१६ ते २०२३ या काळातील भविष्यकालीन दौरा कार्यक्रमासाठी बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिवांना नियुक्त करण्यात आले असून आयसीसीद्वारे सामन्यांचे समान प्रमाणावर वितरण होण्यासाठी दोघेही प्रयत्न करणार आहेत. २०१५ ते २०२३ या काळात भारत आपले सामने क्रिकेटमधील दिग्गजांविरुद्ध खेळणार आहे. याअंतर्गत भारताला इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक २० कसोटी, आॅस्ट्रेलियाविरुद्ध १६ आणि द. आफ्रिकेविरुद्ध १२ कसोटी सामने खेळायचे आहेत. यामुळे अन्य परदेशी संघांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होऊ शकते.(वृत्तसंस्था)