शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील घोटाळ्यात ३३ गुन्हे दाखल

By admin | Updated: December 11, 2015 00:02 IST

भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळे, तसेच खरेदी व कामातील कमिशनमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसंदर्भात केंद्रीय

नवी दिल्ली : भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळे, तसेच खरेदी व कामातील कमिशनमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसंदर्भात केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) पथकाने आतापर्यंत ३३ गुन्ह्यांची नोंद केली आहे.केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातील उपकरणे खरेदी, बांधकाम, कर्मचारी भरती, सल्लागार-सेवा, सुविधांचा दुरुपयोग, तिकिटांची विक्री, आयोजनातील संपत्ती आदींतील गैरव्यवहाराबाबत एकूण ३३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील १९ नियमित प्रकरणे असून, १४ प्रकरणांचा प्रारंभिक तपास सुरू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. सीबीआयला मिळालेल्या माहितीनुसार १४ आरोपी, तसेच ११ फर्मविरुद्ध आठ नियमित प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विविध देशांकडून माहिती मिळविण्यात अडचणी येथे असल्याने घोटाळ्याचा तपास करण्यात सीबीआयला अडचणी येत असल्याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले. याशिवाय विदेशात स्थायिक असलेल्या आरोपींची विचारपूस करण्यातही सीबीआयला अडचण येत असून, दिल्ली विशेष पोलीस सेलकडून परवानगी घेण्यात अनेक अडचणी येतात, त्यामुळे तपासाची गती मंदावली आहे. नवी दिल्ली येथे २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी अनेक आरोपींसह आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनादेखील तिहार कारागृहाची हवा खावी लागली होती. (वृत्तसंस्था)