शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

१९६४ स्पेनचे पहिले विजेतेपद

By admin | Updated: June 2, 2016 02:06 IST

युरोपात बाळसे धरू लागलेल्या दुसऱ्या युरोपियन नेशन्स कप स्पर्धेची अंतिम फेरी स्पेनमध्ये झाली. या स्पर्धेत यजमान स्पेनने विजेतेपद मिळवले. सोव्हिएत युनियन उपविजेता ठरला.

युरोपात बाळसे धरू लागलेल्या दुसऱ्या युरोपियन नेशन्स कप स्पर्धेची अंतिम फेरी स्पेनमध्ये झाली. या स्पर्धेत यजमान स्पेनने विजेतेपद मिळवले. सोव्हिएत युनियन उपविजेता ठरला. २९ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा त्या वेळी एकाच देशाच्या यजमानपदाखाली घेण्याची प्रथा नव्हती. होम आणि अवे या प्रकारातून सोव्हिएत युनियन (रशिया), डेनेस, स्पेन आणि हंगेरी हे चार संघ सेमी फायनलमध्ये आले. बार्सिलोना येथे झालेल्या सामन्यात रशियाने डेन्मार्कला ३-० ने हरवून सहजपणे अंतिम फेरी गाठली. माद्रिद येथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्पेन आणि हंगेरी यांची लढत १-१ अशी बरोबरीत चालली होती; परंतु अ‍ॅमन्सीओने जादा वेळेत गोल करून स्पेनला अंतिम फेरीत नेले. १९६० च्या उपांत्य फेरीत राजकीय कारणास्तव स्पेनचे सर्वेसर्वा जनरल फ्रँको यांनी स्पेनला रशियात खेळण्यास परवानगी दिली नव्हती. पण नियतीने या दोन्ही संघांना पुढच्याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमने-सामने आणले. जनरल फ्रँको या वेळी कोणता निर्णय घेणार, याच्याकडे फुटबॉलजगताचे लक्ष लागले होते. पण जनरल फ्रँको यांनी या वेळी जनभावनेचा आदर करीत रशियन संघाला स्पेनमध्ये प्रवेश दिला आणि २१ जून १९६४ रोजी रशिया-स्पेन दरम्यान ऐतिहासिक फायनल रंगली. माद्रिदच्या सॅन्टिगो स्टेडियमवर अंतिम सामना पाहण्यास ७९ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. जे. एम. पेरेडाने सहाव्या मिनिटाला गोल करून स्पेनला आघाडीवर नेले; परंतु पुढच्या दोनच मिनिटांत खुसाईनोव्हने रशियाला बरोबरी साधून दिली. ही बरोबरी पुढे ७६ मिनिटे कायम होती. सामना संपता-संपता ८४ व्या मिनिटाला मार्सेलिनोने गोल डागून स्पेनला चॅम्पियनशिप मिळवून दिली. पहिल्या स्पर्धेत राजकीय अपरिहार्यतेमुळे हात चोळत बसलेल्या स्पेनने रशियाला अंतिम फेरीत हरवून वचपा काढला. हंगेरी तिसऱ्या, तर डेन्मार्क चौथ्या स्थानावर राहिला.