शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळेचे काम रखडले

By admin | Updated: November 4, 2015 01:04 IST

नेरूळमधील महापालिका शाळेच्या इमारतीच्या बांधकामाची मुदत संपली आहे. काम धिम्या गतीने सुरू असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली असून, लवकरात

नवी मुंबई : नेरूळमधील महापालिका शाळेच्या इमारतीच्या बांधकामाची मुदत संपली आहे. काम धिम्या गतीने सुरू असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. येथील सेक्टर १६ मधील महापालिकेची शाळेची इमारत धोकादायक झाल्यामुळे पालिकेने ४ कोटी ८७ लाख रुपये खर्च करून नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू केले आहे आॅगस्ट २०१५ मध्ये बांधकामाची मुदत संपली आहे, परंतु अजून काम पूर्ण झालेले नाही. इमारतीचे बांधकाम सुरू असल्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना कुकशेत व इतर ठिकाणी जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय दुर करण्यासाठी बांधकाम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेरूळ तालुकाप्रमुख गणेश भगत व नगरसेविका रूपाली किस्मत भगत यांनी बांधकाम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी पालिकेकडे केली असून, सर्वसाधारण सभेमध्येही प्रश्न उपस्थित केला आहे. सर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रश्नाला आयुक्त दिनेश वाघमारे यांनी लेखी उत्तर दिले आहे. शाळेचा पाया खोदताना खडक लागल्यामुळे नगररचना विभागाच्या मंजुरी प्रक्रियेस विलंब लागला आहे. तांत्रिक अडचणींमुळे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नसून डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्ण केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु कामाची गती पाहता ते डिसेंबरपर्यंतही पूर्ण होण्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)