शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 23:20 IST

नवी मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आणली.

नवी मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आणली असून, बनावट इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचा बनाव करून एका महिला प्रोफेसरची तब्बल १ कोटी ८१ लाख ७२ हजार ६६७ रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली असून, आरोपींना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 नवी मुंबईत एका नामांकित संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पीडित महिलेला अज्ञात व्यक्तींनी कॉल करून सांगितले की, "दिल्ली येथे तुमच्याविरुद्ध इन्कम टॅक्सची तक्रार दाखल झाली आहे. तुम्ही ८ लाख ६२ हजार रुपयांची टॅक्स थकबाकी न भरता टॅक्स चोरी केली आहे", असा खोटा आरोप करण्यात आला. यानंतर पीडित महिलेला WhatsApp वरून CBI, ED आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट कागदपत्रांची पाठवणी करण्यात आली. 

आरोपींनी महिलेला सांगितले की, "अमित चौधरी" नावाच्या एका आर्थिक घोटाळ्यात तुमचे क्रेडिट कार्ड सापडले आहे. त्यामुळे तुमच्यावर कारवाई होणार आहे. यामुळे घाबरलेल्या महिलेला, तुम्ही सध्या डिजिटल अरेस्ट आहात, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर महिलेला सांगण्यात आले की, तिच्या संपत्तीची पडताळणी करण्यात येणार असून ती कायदेशीर असल्याचे सिद्ध झाल्यावर सर्व रक्कम परत केली जाईल. त्यामुळे महिलेला तिच्या शेअर मार्केट व इतर गुंतवणुकीसंबंधित सर्व माहिती आणि खात्यांचे तपशील देण्यास भाग पाडले गेले. या दरम्यान महिलेकडून एकूण १ कोटी ८१ लाख ७२ हजार ६६७ रुपये आरोपींनी सांगितलेल्या सहा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले. 

काही दिवसांनंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने नवी मुंबई गुन्हे शाखेमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखेने तात्काळ तपास सुरू करून रमेश बाबूलाल शेठ (45), अमित दीपक तुळशीदास शहा (42), आणि राजकुमार नारंग (55) या तिघांना अटक केली. हे आरोपी विविध लोकांना डिजिटल अरेस्ट झाल्याची भीती दाखवत, बनावट सरकारी अधिकारी असल्याचे सांगून पैसे उकळत होते. नवी मुंबई पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी