शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ऋण काढून होणार सण साजरा?

By admin | Updated: October 30, 2015 23:38 IST

दिवाळीसाठी घर, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तु, कपडे, मिठाई इ. च्या खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षीत करण्याच्या दृष्टीने बाजारपेठा हळुहळू सजु लागल्या असल्या तरी रोजगारासाठी आदिवासींचे स्थलांतर

पालघर : दिवाळीसाठी घर, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तु, कपडे, मिठाई इ. च्या खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षीत करण्याच्या दृष्टीने बाजारपेठा हळुहळू सजु लागल्या असल्या तरी रोजगारासाठी आदिवासींचे स्थलांतर, भाववाढीने त्रस्त जनता, बाजारपेठेवरील मंदीचे सावट यामुळे सर्वत्र खरेदी विक्रीच्या सर्वच व्यवहाराला हुडहूडीने ग्रासले आहे. दिवाळीच्या झगमगाटीच्या वातावरणात सर्वसामान्यांच्या उत्साह व आनंदावर त्यामुळे विरजण पडण्याची चिन्हे आहेत.दिवाळी हा सण मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा होतो. त्यासाठी आपल्या आर्थिक कुवतीनुसार बेत आखले जात असतात. पालघर जिल्ह्णातील आठही तालुक्यातील बाजारपेठा, आकाशकंदील, लायटींग, फराळाचे साहित्य, कपडे, सोने खरेदीसाठी सजल्या आहेत.पालघर जिल्ह्णात भात हे प्रमुख पीक असून पावसाच्या लहरी वातावरणामुळे दुष्काळजन्य परिस्थिती नसली तरी शंभर टक्के पीक हातात लागेल याची पुर्ण शाश्वती नसल्याचे चित्र आहे. आजही अधुनमधून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्रूाने लहरी वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील भाताचे पीक पडून आहे. दिवाळी तोंडवर आल्याने हातात पैसे नसल्याने विक्रमगड, जव्हार, मोखाडा इ. भागातील शेकडो कुटूंबे रोजगारासाठी शहरामध्ये दाखल झाली आहेत. जिल्ह्णात वसईपासून ते डहाणूच्या झाई-बोर्डीच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मच्छीमार राहत असून ३ ते ४ हजार लहान मोठ्या नौकाद्वारे मासेमारी केली जात आहे. या व्यवसायामध्ये सुमारे ६० ते ७० हजार कामगार व त्यांच्या कुटूंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबुन आहे. परंतु मत्स्य उत्पादनात मोठी घट होत असल्याने तसेच पर्ससीन नेटधारक, ट्रॉलर्स या महाकाय नौकाद्वारे अपरीमीत मासेमारी होत असल्याने किनारपट्टीवरील पारंपारीक छोटा मच्छीमारास पुरेसे मासे मिळत नसल्याने तो कर्जबाजारी बनला आहे. त्यातच इंधन, बर्फ, साहित्य इ. मोठी भाववाढ झाल्याने उत्पादन व खर्चाचा मेळ बसत नसल्याने अनेक नौका किनाऱ्यावर पडून आहेत.एकंदरीत पाहत भाववाढ, महागाईच्या गर्तेत हा सण सापडला असला तरी दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने काही प्रमाणात खरेदीला मर्यादा आणून त्या दृष्टीने हा सण साजरा करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रश्न करणार असल्याचे अदिती चव्हाण या महिलेने सांगितले. तर बाजारपेठेत सध्या मंदी असली तरी काही दिवसात खरेदीला वेग येईल अशी आशा प्रकाश स्टोर्सच्या मालकाने सांगितले. (वार्ताहर)तारापूर औद्योगिक वसाहत, बिडको वसाहत, जेनेसीस, शक्ती उद्योग औद्योगिक वसाहत पालघर, तलासरी, वाडा, मनोर, वालीव इ. भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखाने असून लाखो स्थानिक व परराज्यातील कामगार या कारखान्यात काम करतात. परंतु बाजारपेठेत मंदीचे वातावरण असल्याने उत्पादनाला मागणी नाही. त्यामुळे येथेही काही प्रमाणात मंदीचे सावट आहे. या कारखान्यामध्ये राजकीय व धनदांडग्यांचे कंत्राटपद्धतीने कामगार पुरविण्याचे ठेके असल्याने कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते. त्यातच दिवाळीच्या सणात हक्काचा मिळणारा बोनसही हद्दपार झाल्याने हाती पडत असलेल्या तुटपूंज्या पगारावर यावर्षी दिवाळी साजरी करण्याची वेळ कामगार वर्गावर आली आहे.