शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे बंधूंसोबत ‘दगाफटका’ करणाऱ्यांना इशारा; घणसोली परिसरात झळकले बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 06:18 IST

शिंदेसेनेने दोन उमेदवार फाेडल्याने मनसेला फटका

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत फोडाफोडीचे राजकारण शिजत असतानाच शिंदेसेनेने उद्धवसेनेचे दोन उमेदवारच फोडले होते. त्याचा फटका ‘मनसे’ला बसला असून, अपेक्षित जागा गमवावी लागल्याची खंत व्यक्त होत आहे. त्यातूनच युतीची उमेदवारी घेऊन शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेऊन दगाफटका करणाऱ्यांना इशारा देणारे बॅनर घणसोलीत झळकत आहेत.

नुकत्याच झालेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धवसेना व मनसेच्या युतीने घणसोली प्रभाग ९ मधून मनसेला १ तर उद्धवसेनेला ३ जागा दिल्या होत्या. मनसेच्या स्थापनेपासून या विभागात सक्रिय असलेले शहर संघटक संदीप गलुगडे यांच्या पत्नी मंदा गलुगडे, उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आत्माराम सणस यांच्या पत्नी गीता सणस, मंगेश साळवी व ऐनवेळी उद्धवसेनेत आलेल्या सचिन शिरसाठ यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी सणस व शिरसाठ हे अर्ज मागे घेऊन भूमिगत झाले होते. त्यामुळे पॅनलमध्ये युतीच्या गलुगडे व साळवी यांच्यापुढे पेचप्रसंग निर्माण झाला होता.

शिंदेसेनेने अगोदरच रचलेल्या डावात युतीचा टिकाव लागला नाही. त्यातूनच ठाकरे बंधूंसोबत गद्दारी करणाऱ्यांना माफी नसल्याच्या इशारा देणारे बॅनर घणसोलीत झळकले आहेत.

असा विरोधकांचा डाव

यापूर्वी निवडणूक लढलेल्या शृंखला गावडे यांनी उद्धवसेनेकडे उमेदवारीसाठी दावा केला होता. मात्र, सणस यांना उमेदवारी दिली गेली; परंतु भाजपमधून ऐनवेळी शिंदेसेनेत गेलेल्या सुनील मस्कर यांनी सणस यांना अगोदरच गळाला लावले होते. तर सचिन शिरसाठ यांनी उद्धवसेनेतून अर्ज भरून ऐनवेळी माघार घेणे हाही विरोधकांचा राजकीय डाव होता, हे युतीच्या उशिरा लक्षात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Betrayal Warning: Banners Appear in Ghansoli Against Thackeray Brothers' Defectors

Web Summary : In Navi Mumbai, banners warn those who betrayed the Thackeray brothers during the municipal elections. Uddhav Sena and MNS faced setbacks as candidates withdrew nominations at the last minute, benefiting the Shinde Sena. Accusations of political maneuvering are surfacing.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे