शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 03:41 IST

सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इमारतींच्या स्लॅबचा भाग कोसळून रोज अपघात होत असून रहिवासी जीव मुठीत घेवून वास्तव्य करत

- नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इमारतींच्या स्लॅबचा भाग कोसळून रोज अपघात होत असून रहिवासी जीव मुठीत घेवून वास्तव्य करत आहेत. नेरूळ सेक्टर ६ मधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये छताचा भाग कोसळून बनुबाई लोंढे (वय ९०) या महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होवून पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लावणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एव्हरग्रीन सोसायटीमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या आशा साबळे यांच्या घरामध्ये १६ जुलैला पहाटे सहा वाजता स्लॅबचा काही भाग कोसळला. छताचे प्लास्टर आशा यांच्या आई बनुबाई लोंढे यांच्या छातीवर कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयात नेण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईला सायनमधील लोकमान्य टिळक रूग्णालयामध्ये हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसामध्ये एव्हरग्रीन सोसायटीमध्ये चार ठिकाणी छताचे प्लास्टर कोसळले आहे. या शेजारी असलेल्या दत्तकृपा सोसायटीही धोकादायक घोषित करण्यात आली आहे. दत्तकृपाची स्थिती एव्हरग्रीनपेक्षा गंभीर असून तेथे छताच्या प्लास्टरबरोबर जीनेही निखळू लागले आहेत. दत्तकृपा यापूर्वीच धोकादायक घोषित करण्यात आली आहे.परंतु अद्याप तिच्या पुनर्बांधणीला परवानगी देण्यात आलेली नाही. नेरूळ सेक्टर २४ मधील स्वागत गृहनिर्माण सोसायटीमध्येही दोन दिवसांपूर्वी स्लॅबचा काही भाग कोसळला असून वाशीमधील एकता सोसायटीमध्ये स्लॅबचा भाग कोसळून एक जखमी झाला आहे. महानगरपालिकेने शहरातील ३१५ बांधकामे धोकादायक घोषित केली आहेत. धोकादायक बांधकामांमध्ये सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारतींचाही समावेश आहे. सीवूड, नेरूळ, वाशी, तुर्भे परिसरामधील जुन्या इमारती जर्जर झाल्या असून इमारतींच्या स्लॅबचा भाग वारंवार कोसळू लागला आहे. स्लॅब कोसळून आतापर्यंत अनेकजण जखमी झाले आहेत. अनेकांनी स्वत:ची हक्काची घरे सोडून दुसरीकडे भाडेतत्त्वावर घरे घेवून राहण्यास सुरवात केली आहे. ज्यांना पर्याय नाही ते मोडकळीस आलेल्या इमारतीमध्येच जीव मुठीत घेवून वास्तव्य करत आहेत. प्रत्येक सूर्योदयाबरोबर या रहिवाशांना पुनर्जन्म झाल्याचा अनुभव येवू लागला आहे. पावसाळ्यात कधी कोणती इमारत कोसळेल व प्राणाला मुकावे लागेल याची खात्री राहिलेली नाही. जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वीच अडीच एफएसआय मंजूर केला आहे. परंतु सिडको व महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे अद्याप एकाही इमारतीच्या बांधकामाला परवानगी मिळालेली नाही. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत. पालिकेला किती बळी हवे आहेत?महापालिका प्रत्येक वर्षी धोकादायक इमारतींची नावे जाहीर करत असते. रहिवाशांना घरे खाली करण्यासाठी नोटीस दिली जात असून अनेकांची नळजोडणीही खंडित केली आहे. घरे खाली करण्यास भाग पाडणारी पालिका पुनर्बांधणीसाठी मात्र परवानगी देत नसून अजून किती बळी गेल्यानंतरही प्रशासन जागे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रहिवासी भयभीतधोकादायक इमारतीमधील रहिवासी जीव मुठीत घेवून जगत आहेत. परंतु आतापर्यंत कधीही कोणाचा मृत्यू झाला नव्हता. एव्हरग्रीन सोसायटीमधील घटनेनंतर धोकादायक इमारतीमधील रहिवासी भयभीत झाले आहेत. पाऊस सुरू झाला की इमारत कोसळण्याच्या भीतीने रहिवाशांच्या पोटात गोळा येवू लागला आहे. एव्हरग्रीन सोसायटीमध्ये आतापर्यंत चार ठिकाणी स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटे स्लॅब कोसळून बनुबाई लोंढे जखमी झाल्या होत्या. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. शासन व प्रशासनाने जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीविषयी ठोस भूमिका घ्यावी. - महादेव पवार, सामाजिक कार्यकर्ते, नेरूळ