शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिमुरड्यांच्या अपहरणाचा प्रयत्न

By admin | Updated: July 9, 2017 02:14 IST

पायी चाललेल्या महिलेकडील दोन चिमुरड्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना नेरुळमध्ये घडली आहे; परंतु वेळीच महिलेने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पायी चाललेल्या महिलेकडील दोन चिमुरड्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना नेरुळमध्ये घडली आहे; परंतु वेळीच महिलेने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी केलेल्या मदतीमुळे अपहरणकर्त्याचा डाव फसला आहे. या अपहरणकर्त्याला नागरिकांनी पकडून नेरुळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.नेरुळ येथील सारसोळे डेपोलगत शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला आहे. आरती पाटील या त्यांचा मुलगा कृष्णा (०४) व त्या ज्यांच्याकडे काम करतात त्या सुनील पाटील यांची मुलगी दक्षता (०४) या दोघांना घेऊन रस्त्याने चालल्या होत्या. दोघेही प्लेस्कूलमध्ये शिकत असून दररोज सकाळी आरती पाटील त्यांची ने-आण करायच्या. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी त्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन रस्त्याने चालल्या असताना, समोरून आलेल्या एका व्यक्तीने दोन्ही मुलांना हिसकावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सदर व्यक्तीने आरती पाटील यांना धक्का देऊन मुलांना उचलून पळ काढताच, त्यांनी आरडाओरडा केला. त्यांनी मदतीसाठी दिलेली हाक ऐकताच परिसरातील काही व्यक्तींनी त्या ठिकाणी धाव घेत, मुलांना घेऊन पळणाऱ्या व्यक्तीला पकडले. या वेळी त्याने नागरिकांसोबतही धक्काबुक्की करून पळण्याचा प्रयत्न केला असता, जमावाने त्याला चोप दिला. तसेच संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत त्याचे नाव रामसुख रामजीयामन असल्याचे समोर आले. त्याच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याने दोन्ही मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न कशासाठी केला, याचा उलगडा अद्यापपर्यंत झालेला नाही.