शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन कंत्राटींना वेतन मिळाले

By admin | Updated: November 11, 2015 00:08 IST

मीरा-भार्इंदरची परिवहन सेवा चालवणाऱ्या कॅस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये तडजोड होऊन कर्मचाऱ्यांना थकीत वेतन रोखीने देण्यात आले

मीरा रोड : मीरा-भार्इंदरची परिवहन सेवा चालवणाऱ्या कॅस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये तडजोड होऊन कर्मचाऱ्यांना थकीत वेतन रोखीने देण्यात आले तर ५ वर्षांची सेवा असताना भविष्य निर्वाह निधीचा केवळ १५ महिन्यांच्या रकमेचा धनादेश थेट कर्मचाऱ्याच्या नावे देण्यात आला. २०१० मध्ये पालिकेने पीपीपी तत्त्वावर परिवहन सेवा कॅस्ट्रलला चालवण्यास दिल्यापासून काम करणारे अनेक कर्मचारी आहेत. सेवा बंद करतेवेळी सुमारे ४५० कर्मचारी कामास होते. काहींचा आॅगस्ट तर काहींचा सप्टेंबर, आॅक्टोबर असा पगार तसेच भविष्य निर्वाह निधी ठेकेदाराने थकवला होता. ठाणे उपकामगार आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत ठेकेदारास ७ नोव्हेंबरपर्यंत थकीत पगार देण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने रविवारी उल्हासनगर येथे कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले. ठेकेदार व डॉ. पा.रा. किनरे यांची राष्ट्रीय कामगार संघटना यांच्यात तडजोड झाली. त्यानुसार, थकीत पगार रोखीने देण्यात आला. तर, तडजोड म्हणून भविष्य निर्वाह निधीच्या ५ वर्षांच्या थकबाकीऐवजी केवळ १५ महिन्यांच्या रकमेचे धनादेश देण्यात आले. डिसेंबर महिन्यातील हे धनादेश असून सुमारे ३० कर्मचाऱ्यांनी तडजोडीस विरोध केल्याने त्यांचा पगारही दिला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आमच्या संघटनेनेच तडजोड केली. शेवटी, कर्मचारी किती लढणार, असा सवाल करत जे मिळेल ते घ्यावे लागेल, अशी खंत काही कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.