पनवेलमध्ये आज रक्तदान शिबिर

By Admin | Updated: July 2, 2017 06:23 IST2017-07-02T06:23:09+5:302017-07-02T06:23:09+5:30

लोकमतचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रविवारी २ जुलैला पनवेलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

Today Blood Donation Camp in Panvel | पनवेलमध्ये आज रक्तदान शिबिर

पनवेलमध्ये आज रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : लोकमतचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रविवारी २ जुलैला पनवेलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब आॅफ न्यू पनवेल चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ. बी. व्ही. लिमये ब्लडबँक, सेक्टर-१, खांदा कॉलनी येथे सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत रक्तदान करता येणार आहे. ‘लोकमत’ आणि रोटरी क्लब आॅफ न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. अपघातांमध्ये जखमींना रक्त पुरविताना रक्तपेढींवरही ताण येत आहे. रक्ताची आवश्यकता लक्षात घेऊन नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. ‘लोकमत सखी मंच’ व्यासपीठाच्या सभासदांनाही या ठिकाणी रक्तदान करता येणार असून, महिलांनीही या शिबिरामध्ये सहभागी होता येणार आहे.

Web Title: Today Blood Donation Camp in Panvel