शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाला आज भावपूर्ण निरोप

By admin | Updated: September 27, 2015 00:22 IST

गणरायाला निरोप देण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सर्व विसर्जन तलावांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत

नवी मुुंबई : गणरायाला निरोप देण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सर्व विसर्जन तलावांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वाशीतील शिवाजी चौकामध्ये गणरायांवर पालिकेच्यावतीने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. नवी मुुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये दहा दिवसांपासुन उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये जवळपास १५०० सार्वजनीक व ६५ हजार घरगुती गणेश उत्सवांचे आयोजन केले होते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ४३५ सार्वजणीक गणेश उत्सवाचे आयोजन केले होते. यामधील १७० गणेश मुर्तींना यापुर्वी निरोप देण्यात आला. आनंदचतुर्थीला २६५ गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. शहरातील २२ विसर्जन तलावांवर महापालिकेने चांगली व्यवस्था केली आहे. तलावांवर गणरायांचे स्वागत केले जाणार आहे. अग्निशमन दलाचे जवान तैनात केले आहेत. वैद्यकिय सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे. पोहणाऱ्या तरूणांचे पथक तलाव परिसरात असणार आहे. याशिवाय बाप्पांना व्यवस्थित तलावामध्ये घेवून जाण्यासाठी स्वयंसेवक तैनात केले आहेत. महापालिका वाशी शिवाजी चौकामध्ये गणरायावर पुष्पवृष्टी करणार आहेत. पोलिसांनीही शहरात जय्यत तयार केली आहे. शिवाजी चौकात विसर्जन मिरवणूक वगळता इतर वाहनांना बंदी करण्यात आली आहे. पोलिसांनी शहरात जवळपास १ हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. विसर्जन मार्गावर सिसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. साध्या वेशातील पोलिस सर्व ठिकाणी तैनात असणार आहेत. असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त शहाजी उमाप व सुरेश मेंगडे यांनी दिली. (प्रतिनिधी)