शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मकरसंक्रांतीसाठी यंदा हलव्याने नटविलेले मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:02 IST

परिस्थितीनुसार बदलला ट्रेंड

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जानेवारीच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. या सणानिमित्त नवदाम्पत्याला हलव्याचे दागिने घातले जातात. सुनेचे आणि लाडक्या जावयाचे कौतुक केले जाते. त्यांच्याप्रमाणेच नवजात बालकांनाही मकरसंक्रांतीच्या दिवशी हलव्याचे दागिने घालून, सजवून तयार करतात. यंदा यात भर पडली आहे ती मास्कची. काटेरी हलव्याने सजविलेले मास्क २०० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत.

गुरुवारी मकरसंक्रांत आहे. त्यानिमित्ताने तिळगुळाबरोबर हलव्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नवदाम्पत्यांसाठी हा सण खास असतो. या दिवशी नव्या जोडप्याचे कौतुक केले जाते. सासरी सून आणि जावयाचे लाड होतात. त्यांच्याप्रमाणेच नवजात बालकांनाही मकरसंक्रांतीच्या दिवशी हलव्याचे दागिने घालून, सजवून तयार करतात. त्यांचे लाड पुरवले जातात. बालकांना बोरन्हान घालण्याचीदेखील प्रथा आहे. हलव्यापासून मंगळसूत्र, नथ, चिंचपेटी, बांगड्या ते बाजूबंद, ठुशी, बिंदिया, मुकुट असे विविध दागिने बनविले जातात. महिला आणि पुरुष मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हे हलव्याचे दागिने घालतात. घरातील वरिष्ठ मंडळी या दिवशी नवदाम्पत्यांचे औक्षण करतात. 

यंदा हलव्याने नटविलेल्या मास्कची भर पडलीआहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे अनिवार्य असल्याने संक्रांतीचे औचित्य साधून खास मास्क आले आहेत. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात, त्यानुसार मास्कही काळ्या रंगात तयार केले असून त्यावर सफेद रंगाच्या हलव्याने नक्षीकाम केले आहे. त्यामुळे ते अधिक खुलून दिसत आहे. 

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती