शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार फेरीवाल्यांची झाली नोंद

By admin | Updated: November 13, 2014 22:55 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून आणि राज्य शासनाच्या सूचनेवरून राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंमलात आणावयाचे आहे.

कल्याण : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून आणि राज्य शासनाच्या सूचनेवरून राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंमलात आणावयाचे आहे. या अंतर्गत केल्या जाणा:या फेरीवाल्यांच्या सर्वेक्षण प्रक्रियेचा आढावा घेता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क, ग आणि फ या तीन प्रभागांचे सर्वेक्षण पुर्ण झाले असून यात एकुण साडेतीन हजार फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने राष्ट्रीय फेरीवाला धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत देशातील सर्व स्थानिक स्वराज्य स्थानिक संस्थांनी उपविधी तयार करून त्याप्रमाणो कार्यवाही करावयाची आहे. या अनुषंगाने केडीएमसीने महापौर यांच्या अध्यक्षतेखाली शहर फेरीवाला समिती स्थापन करून प्रभाग स्तरावर पार पडलेल्या बैठकांमध्ये उपविधी तयार केली गेली होती.परंतू न्यायालयाच्या आदेशानुसार महापौर यांच्या अध्यक्षतेखालील सर्व समित्या बरखास्त करून त्या आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नेमून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या आहेत. या धोरणांतर्गत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले जाणार असून केडीएमसीने फेरीवाला सर्वेक्षणाचे काम अॅबल सॉफ्टवेअर या संस्थेला दिले आहे. मध्यंतरी या सर्वेक्षणाला फेरीवाला संघटनांनी आक्षेप घेतला होता. संघटनांना विश्वासात न घेता परस्पर सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून सर्वेक्षण करणारी संस्था ही बाहेरची असल्याने त्यांना स्थानिकांची कल्पना नाही त्यामुळे मुळ फेरीवाला या नोंदणी प्रक्रियेत वंचित राहण्याची शक्यता असल्याने घुसखोरांची नोंद होण्याची भीती काही फेरीवाला संघटनांकडुन व्यक्त करण्यात आली होती. हे आरोप फेटाळून लावताना प्रभागातील पथकप्रमुखाला सोबत घेऊनच सर्वेक्षण केले जात असल्याचा दावा या संस्थेमार्फत करण्यात आला होता. दरम्यान संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात केडीएमसीच्या 7 प्रभागांपैकी 3 प्रभागांमधील सर्वेक्षण पुर्ण झाले असून उर्वरीत 4 प्रभागांचा सर्वे देखील लवकरच पुर्ण होईल अशी माहीती अॅबल सॉफ्टवेअरचे संस्थाचालक जयदीप वैराळ यांनी दिली.  (प्रतिनिधी)