शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

टँकर लॉबीचं चांगभलं

By admin | Updated: December 18, 2015 00:46 IST

एखाद्या भागात तीव्र पाणीटंचाई असेल आणि दुसरीकडे मुबलक पाणी उपलब्ध असेल तर ते टंचाईग्रस्त भागाकडे नेणे गरजेचे ठरते. त्याच हेतूने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची

- प्राची सोनवणे,  नवी मुंबई एखाद्या भागात तीव्र पाणीटंचाई असेल आणि दुसरीकडे मुबलक पाणी उपलब्ध असेल तर ते टंचाईग्रस्त भागाकडे नेणे गरजेचे ठरते. त्याच हेतूने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची संकल्पना पुढे आली. यावर अंकुश राहावा म्हणून सिडको प्रशासन व नवी मुंबई महानगरपालिकेने ही योजना स्वत:कडे ठेवली. मात्र, सध्या त्यातही ठेकेदारांचा शिरकाव झाला आहे. पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट निघू लागल्यामुळे सरकारी नियंत्रण आपोआपच शिथिल झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १६ ठेकेदार असून, टँकर लॉबी सक्रिय झाल्याचे दिसून येते. यातून गैरव्यवहारांचे प्रकार उघडकीस येत आहे. डिसेंबरपासूनच टँकरवर अवलंबून राहावे लागल्याने आणि पाण्यासारख्या मूलभूत गरजेचेही बाजारीकरण झाल्याने जून महिन्यापर्यंत जगायचे कसे असा प्रश्न शहरातील अनेकांना पडला आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी विकत घेणे परवडतेच असे नाही. त्यामुळे नागरिक स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्कसाधून पाण्याच्या टँकरची मागणी करतात. महानगरपालिकेकडे स्वत:च्या मालकीचा एकच टँकर असल्याने नागरिकांना पाण्यासाठी खाजगी टँकर आणावा लागतो. प्रामुख्याने उच्चभ्रू वस्तीमधील नागरिक खासगी टँकर मागवतात.शहरातील काही हॉटेलचालक व बांधकाम व्यावसायिकही टँकरद्वारे पाणी विकत घेत आहेत. पाणीटंचाईचा गैरफायदा घेत टँकरचालक नागरिकांकडून खूपच जास्त पैसे घेतात. सिडकोच्या मालकीचे ८ टँकर असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचे दर आकारले जात नाहीत आणि मागणीनुसार सिडको वसाहतींमध्ये पाण्याचे टँकर त्वरित उपलब्ध करुन दिले जातात. तरीदेखील टँकर चालक वसाहतींमधील नागरिकांकडून अमुक अमुक पैशांची मागणी करतात. खाजगी टँकरसाठी नागरिकांना १२०० ते ३००० रुपयांपर्यंत दर आकारले जातात. पाण्याचा गंभीर प्रश्न असलेल्या कामोठेत २५ ते ३० खाजगी टँकर असून या टँकर चालकांची कोट्यवधीची कमाई सुरू आहे. सीबीडीत १, नेरुळमध्ये ४, वाशीत ४, सानपाड्यात १, तुर्भे परिसरात २, कोपरखैरणेत १, ऐरोलीत १, घणसोलीत १ आणि दिघ्यात १ असे एकूण १६ पाणीपुरवठा ठेकेदार, २७ टँकर पुरवठाधारक असून टँकरच्या वाढत्या मागणीमुळे या टँकर लॉबीला चांगले दिवस आले आहेत. नवी मुंबईमध्ये २४ तास पाणीपुरवठा असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या शहराची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. नवी मुंबईत किमान मूलभूत गरजा, पाणी, रस्ते चांगले असल्याने या शहराला लोकांकडून राहण्यासाठी पसंती दिली जात आहे. मात्र आता नवी मुंबईकरांच्याच तोंडचे पाणी पळाले. मोरबे धरणातील पाणीसाठा फक्त ४५ टक्क्यांवर आला आहे. यामुळे राहिलेला पाणीसाठा पुढील वर्षाच्या जून महिन्यापर्र्यंत टिकवून ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरदिवशी ४२० एमएलडी पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणी आता ३२० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे.पर्यायी पाणीपुरवठा ( नवी मुंबई महानगरपालिका)ठिकाणविहिरीबेलापूर गाव २ शहाबाज१किल्ले गावठाण१नेरुळगाव १ सारसोळे२करावे२दारावे१कुकशेतगाव १वाशीगाव १ जुहूगाव १तुर्भे स्टोअर २ सानपाडा३तुर्भेगाव३इंदिरानगर१गणपतीपाडा१तुर्भे सेक्टर २१ १जलकुंभसेक्टर १९ अ‍े, वाशीसेक्टर २०, वाशीसेक्टर ४ सानपाडातुर्भे स्टोअरबोअरवेलतुर्भे स्टोअर३ इंदिरानगर२पंप हाऊस सेक्टर ७ सीबीडी सेक्टर १९, नेरुळसेक्टर ३ वाशीसेक्टर ३० वाशीमनपाकडे एकच टँकर असून तीव्र पाणीटंचाईच्या असलेल्या ठिकाणी टँकर पुरवला जातो. मोरबे धरणाचा जलसाठा कमी असल्याने जपून पाणी वापरावे.- अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता(पाणीपुरवठा)