शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठा विभागाची सत्त्वपरीक्षा

By admin | Updated: December 12, 2015 01:47 IST

रायगड जिल्ह्यातील २६ लाख लोकसंख्येपैकी नऊ लाख लोकसंख्येचा आधार क्रमांक शिधापत्रिकांना सिडिंग करण्याचे काम अद्याप बाकी आहे. मुदतवाढ देत ३१ डिसेंबर २०१५ ही सरकारने डेडलाइन दिली आहे

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यातील २६ लाख लोकसंख्येपैकी नऊ लाख लोकसंख्येचा आधार क्रमांक शिधापत्रिकांना सिडिंग करण्याचे काम अद्याप बाकी आहे. मुदतवाढ देत ३१ डिसेंबर २०१५ ही सरकारने डेडलाइन दिली आहे. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये काम पूर्ण करणे जिल्हा पुरवठा विभागाची सत्त्वपरीक्षा घेणारे ठरणार आहे.सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधावस्तूंचे वितरण बायोमेट्रिक पध्दतीने करण्याचे ठरविले आहे. रेशनकार्ड आधार क्रमांकासोबत सिडिंग करणे आवश्यक आहे. यासाठी छापील फॉर्ममध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींची माहिती, त्यांचा आधार क्रमांक, बँक पास बुक क्रमांक, मोबाइल क्रमांक, कुटुंबातील ज्येष्ठ महिला सदस्याचा फोटो अशी अद्ययावत माहिती द्यावयाची आहे. सर्व फॉर्म रेशनिंग दुकानदार यांच्याकडे जमा करायचे आहेत. मुदतीत दिले नाही, तर शिधापत्रिका रद्द होऊ शकते. शिधापत्रिकाधारकांना बायोमॅट्रिक पध्दतीचे कार्ड देण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.नागरिकांना याची माहिती व्हावी यासाठी विविध बैठका, बॅनर, पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याने काम रखडले आहे. फॉर्म भरुन देण्यासाठी या आधी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता सरकारने ३१ डिसेंबर २०१५ ही अंतिम डेडलाइन दिली आहे.रायगड जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे २६ लाख आहे. त्यापैकी प्राधान्य गटातील आणि अंत्योदय योजनेतील असे एकूण सुमारे २२ लाख लोकसंख्येपैकी ९ लाख लोकसंख्येचे आधार क्रमांक सिडिंगचे काम बाकी आहे. आतापर्यंत सुमारे ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सिडिंगचे काम ३१डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी एस.एम. दुफारे यांनी लोकमतशी बोलताना दिली. प्रगती झेरॉक्स यांना हे काम देण्यात आल्याचे दुफारे यांनी सांगितले.>> १३१० रेशनिंग दुकाने१५ तालुक्यातील रेशनिंग दुकानांची संख्या एक हजार ३१० आहे. केशरी रंगाचे शिधापत्रिकाधारक दोन लाख १० हजार, पिवळे शिधापत्रिकाधारक (अंत्योदय) ८१ हजार, दारिद्र्य रेषेखालील ७९ हजार, आणि शुभ्र शिधापत्रिकाधारकांची संख्या एक लाख १० हजार आहे.