शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीच्या बैठकीत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2015 23:34 IST

गुरुवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत मलप्रक्रिया केंद्र देखभाल दुरुस्तीच्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्यामुळे

नवी मुंबई : गुरुवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत मलप्रक्रिया केंद्र देखभाल दुरुस्तीच्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्यामुळे सभा गुंडाळण्यात आली. प्रस्तावात अर्थकारण दडले असल्यामुळेच त्याला स्थगिती दिल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला.नेरुळ, वाशी व ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचा एकूण ११ कोटी २४ लाख ६६ हजार ३८९ रुपये प्रतिवर्षी खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला होता. तीनही प्रस्ताव यापूर्वी १६ सप्टेंबरच्या बैठकीतही मंजुरीसाठी आले होते. त्यावेळीही या प्रस्तावांना स्थगिती मिळाली होती. गुरुवारी पुन्हा समितीपुढे आलेल्या या प्रस्तावांना सभागृह नेते जयवंत सुतार यांनी स्थगिती मागितली. आयुक्तांच्या उपस्थितीतच या प्रस्तावांवर चर्चा व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. परंतु हे प्रस्ताव स्थगित ठेवल्यास इतरही दोन प्रस्ताव स्थगित ठेवण्याची मागणी नगरसेवक रामचंद्र घरत यांनी केली. परंतु प्रस्तावात अर्थकारण दडल्यामुळे त्याला सतत स्थगिती मिळत असल्याचा आरोप नगरसेवक शिवराम पाटील यांनी केला. तसेच पंचमहाभुतांची पूजा झालेली नाही का ? असाही टोला त्यांनी मारला. मलप्रक्रिया केंद्रात शुध्द केलेले पाणी खरेदीसाठी एक कंपनी सरसावली होती. त्यांना २ रुपये ५० पैसे लिटर दराने पाणी दिले जाणार होते. यामुळे सुमारे ७० कोटी रुपयांचा वार्षिक नफा पालिकेला होणार होता. मात्र कोणीतरी प्रतिलिटर २५ पैशाप्रमाणे रकमेची मागणी केल्याने कोणतीच कंपनी पाणी खरेदीसाठी पुढे न आल्याचाही आरोप पाटील यांनी केला.मलप्रक्रिया केंद्र म्हणजे पांढरा हत्ती झाले असून त्यांच्या देखभालीवर अनावश्यक खर्च होत असल्याचा आरोप नगरसेवक मनोहर मढवी यांनी केला. शहरातील सहा मलप्रक्रिया केंद्राची एकूण क्षमता ४२४ दशलक्ष लिटर असतानाही त्याठिकाणी अवघ्या १८२ दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रियेसाठी येत आहे. त्यामुळे देखभालीसाठी कोट्यवधी रुपये खर्चाची आवश्यकता नसल्याचेही ते म्हणाले. मात्र विरोधकांची मागणी डावलून बहुमताच्या आधारे सभापती नेत्रा शिर्के यांनी प्रस्तावाला स्थगिती दिली. यामुळे संतप्त झालेल्या रामचंद्र घरत यांनी माईक आपटून राग व्यक्त केला. विरोधकांकडून स्थगितीची मागणी झालेल्या प्रस्तावात चर्चेसाठी काही महत्त्वाचे नव्हते, यामुळे त्यास मंजुरी दिल्याचे सभापती शिर्के यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दिघा येथील अनधिकृत बांधकामावर सुरू असलेल्या कारवाईमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. त्यांच्याकरिता तात्पुरत्या निवाऱ्याची सोय तसेच येत्या काही दिवसात दिघा येथे रस्ता रुंदीकरणादरम्यान होणाऱ्या कारवाईत रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न या सर्वांवर काही सदस्यांना स्थायी समितीच्या बैठकीत बोलायचे होते. परंतु सत्ताधारी व विरोधक यांच्यात झालेल्या शाद्बिक चकमकीमुळे सभापतींनी सभा तत्काळ उरकली. यामुळे सदर विषयावर चर्चा न करता आल्याचा संताप नगरसेविका अपर्णा गवते, नगरसेवक शिवराम पाटील, मनोहर मढवी, जगदीश गवते आदींनी केला. त्यांनी सभा संपल्यानंतर सभापती नेत्रा शिर्के यांना धारेवर धरत आपला रोष व्यक्त केला.