शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल पॅरेंट्सच्या मुलाला प्रवेश नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:59 IST

शाळेचा अजब फतवा; पालकांमध्ये संताप; कारवाईची मागणी

नवी मुंबई : वाशी येथील सेंट लॉरेन्स या खासगी शाळेने अजब फतवा काढला असून, सिंगल पॅरेंट्स असल्याने पाल्यांना शाळेत प्रवेश दिला जात नाही. या शाळेच्या मुख्याध्यापिकेने सिंगल पॅरेंट्स असलेल्या सुजाता मोहिते या महिलेच्या मुलाला शाळेत प्रवेश देण्याबाबत नकार दिला असून मुख्याध्यापिकेच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाळेच्या या फतव्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.नवी मुंबई शहरात खासगी संस्थांच्या शाळा मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने अटी-शर्ती लागू केल्या जात असल्याने त्याचा नाहक मनस्ताप पालकांना सहन करावा लागत आहे. याचेच एक उदाहरण समोर आले असून वाशीतील सेंट लॉरेन्स या खासगी शाळेत जागा शिल्लक असतानाही मोहिते या महिला सिंगल पॅरेंट्स असल्याने त्यांच्या पाल्याला प्रवेश नाकारण्यात आला आहे. मोहिते यांनी प्रवेश नाकारण्याचे कारण विचारले असता सिंगल पॅरेंट्सला प्रवेश दिला जात नसल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिकेने सांगितले असून, याबाबतचा व्हिडीओ या महिलेने कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आहे. मुलांना शाळेत प्रवेशासाठी शाळा प्रशासन असे मनमानी अटी-शर्ती लागू करीत असल्यास विभक्त झालेल्या किंवा हयात नसलेल्या पालकांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचे की नाही, असा सवाल पालक उपस्थित करू लागले आहेत. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकेची प्रतिक्रि या घेण्यासाठी संपर्क केला असता होऊ शकला नाही.सिंगल पॅरेंट्समुळे आम्हाला खूप समस्या येतात, त्या हॅण्डल होत नसल्याचे मुख्याध्यापिकेने म्हटले आहे. प्रवेशानंतर पालक विभक्त झाल्यास काय? असा सवाल या मोहिते यांनी मुख्याध्यापिकेला केला असता, ‘त्याला मी जबाबदार नाही’ असे उत्तर मुख्याध्यापिकेने दिले असल्याचे कॅमेºयात बंदिस्त झाले.