शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षक मंडळाच्या कार्यालयात भरती घोटाळा

By admin | Updated: December 20, 2015 02:46 IST

सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. २५ मराठी तरुणांकडून तब्बल १२ लाख रुपये घेऊन त्यांना खोटी

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. २५ मराठी तरुणांकडून तब्बल १२ लाख रुपये घेऊन त्यांना खोटी नियुक्तीपत्रं देण्यात आली. पाच महिने काम केल्यानंतर बोर्डाने ही नियुक्तीपत्रे व सर्व कागदपत्रं खोटी असल्याचे सांगून हात झटकले आहेत. सुरक्षारक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्ह्णाचे मुख्य कार्यालय नवी मुंबईमधील सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये सुरू करण्यात आले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नोकरीसाठी आलेल्या तरुणांनी सुरक्षारक्षकाची नोकरी मिळावी, यासाठी सुरक्षारक्षक मंडळाकडे अर्ज केले होते. मंडळामध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एम. जी. मिश्रा (नोंदणी क्रमांक ४८१८६) ‘मी तुम्हाला नोकरी मिळवून देतो. मंडळातील सुरक्षा निरीक्षक एम. के. भोसले साहेब भरतीचे सर्व पाहतात’, असे सांगत भरतीसाठी ५० हजार रुपये व सुपरवायजरसाठी ६० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. यापूर्वी मिश्राने अनेकांना नोकरीस लावले होते. विशेष म्हणजे पाच ते सहा महिन्यांमध्ये हमखास नोकरी मिळवून दिली जात होती. यामुळे अनेक तरुणांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. या तरुणांकडून पैसे घेऊन त्यांना मुंबईतील विविध शासकीय आस्थापना व निवासी संकुलांमध्ये सुरक्षेसाठी तैनात केले. दोन ते तीन महिने या तरुणांच्या बँक खात्यांमध्ये पगारही जमा करण्यात आला. परंतु मागील दोन महिने पगार मिळत नसल्याने जवळपास २५ तरुणांनी सानपाडामधील बोर्डाच्या कार्यालयात विचारपूस केली असता, त्यांना दिलेली नियुक्तीपत्रे व इतर सर्व कागदपत्रं बोगस असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या तरुणांना धक्का बसला. ‘आम्ही सुरक्षारक्षकाची नोकरी करीत आहोत. दोन महिन्यांचा पगारही मिळाला असताना आता आमची कागदपत्रे बनावट कशी काय’, असा प्रश्न उपस्थित केला. कर्मचाऱ्यांनी एम. के. भोसलेविषयी सांगितले, परंतु अशाप्रकारे कोणीही बोर्डात नोकरीला नसल्याचे सांगण्यात आले. फसविण्यात आलेल्या तरुणांनी सानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली; परंतु त्यांची दखल घेतली नाही. पोलिसांनी तक्रार घेतलीच नाही. काही कर्मचाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांकडे जाण्यास सांगितले. तरुण तेथेही गेले, परंतु उपायुक्त शहाजी उमाप बंदोबस्तावर असल्याने भेटू शकले नाहीत. तरुणांनी लोकमत कार्यालयात येऊन त्यांच्या व्यथा सांगितल्या. ‘आमची फसवणूक झाली असून, आमची कोणीच दखल घेत नाही. आमचे पैसे गेले त्याचे दुख नाही; आम्हाला नोकरी मिळावी एवढीच अपेक्षा आहे. अनेकांनी कर्ज घेऊन पैसे भरले आहेत. सुरक्षारक्षक मंडळ दखल घेत नसल्याने जायचे कुठे’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.पोलीस उपायुक्तांकडे धाव नोकरीसाठी पैसे घेऊन फसविण्यात आलेले सर्व तरुण मराठी आहेत. दोन दिवसांपासून ते सुरक्षारक्षक मंडळाच्या सानपाडा येथील मुख्य कार्यालयात येऊन चौकशी करीत आहेत. परंतु त्यांची दखल घेतली जात नाही. सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनीही तक्रार घेतली नाही.शनिवारी पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या कार्यालयात जाऊन आले, परंतु बंदोबस्तामुळे ते भेटले नाहीत. उमाप यांनी अवैध व्यवसायांविरोधात जोरदार मोहीम उघडली असल्यामुळे ते आम्हाला न्याय देतील, अशी अपेक्षा या तरुणांनी व्यक्त केली आहे. आम्हाला आमची नोकरी परत मिळावी, असा आशावादही या तरुणांनी व्यक्त केला आहे. सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती होण्यासाठी एम. जी. मिश्रा याने सुरक्षा निरीक्षक एम. के. भोसले यांच्या नावाने ६० हजार रुपये घेतले. नियुक्तीपत्र, पोलिसांचे चारित्र्य पडताळणी व सर्व गोष्टी रीतसर केल्या. नोकरी केल्यानंतर दोन महिने पगारही मिळाला; परंतु आता नियुक्तीपत्रं खोटी असल्याचे सांगितले जात आहे. - प्रशांत शिर्के, मीरा रोड सुुरक्षारक्षक मंडळ मराठी मुलांसाठीच सुरू केले असल्याचे सांगून आमच्याकडून ६० हजार रुपये घेतले. सुरक्षा पर्यवेक्षकाची नोकरी दिली. अजूनही मी नोकरीवर कार्यरत आहे; परंतु आता मंडळाच्यावतीने आमची नियुक्ती झालीच नसल्याचे सांगितले.- प्रवीण वाघेवांद्रे व मुंबईमध्ये विविध शासकीय आस्थापनांमध्ये सुरक्षारक्षक म्हणून चार महिने काम केले आहे. पगारही युनियन बँक खात्यात जमा झाला. आता अचानक आमची ड्युटी बंद झाल्याने चौकशी केली असताना आमची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. आम्हाला न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा. - नवनाथ चेतवडेकर, वडाळा