शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2015 22:48 IST

वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने मंगळवारी शहराला झोडपले. सलग दुसऱ्या दिवशीच्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मुसळधार पावसाने शहरातील विविध ठिकाणी

नवी मुंबई : वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने मंगळवारी शहराला झोडपले. सलग दुसऱ्या दिवशीच्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मुसळधार पावसाने शहरातील विविध ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याने झोपडपट्टीवासीयांचे अतोनात हाल झाले.मंगळवारी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. नवी मुंबईकरांना झोडपून काढणाऱ्या पावसाबरोबरच जोराचे वारे देखील वाहत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडत होत्या. त्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन विभाग व अग्निशमन दलाकडून त्याठिकाणी जावून पडलेली झाडे हटवली जात होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. घणसोली येथील रिलायन्स कंपनीजवळ, रबाळे येथील सिध्दार्थ नगर, सीबीडी सेक्टर १,४ व ८, आयकर कॉलनी, सानपाडा सेक्टर ३ परिसरातील भाजी मंडईजवळ,ऐरोली सेक्टर ५ पेट्रोल पंपाजवळ, नेरु ळ सेक्टर १३ एस.बी.आय. कॉलनीजवळ अशा नऊ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.सीबीडीतील रमाबाई आंबेडकर नगर तसेच दुर्गामाता झोपडपट्टी परिसरात अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सोसाट्याचा वारा व पावसाने अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, रेल्वे वाहतुकीवरही या पावसाचा परिणाम झाल्याने लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. (प्रतिनिधी)