शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाविषयी जनजागृती रॅली

By admin | Updated: October 3, 2015 02:35 IST

नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व पटावे याकरिता लोकमत माध्यम प्रायोजक आयोजित फोर्टीज रुग्णालय, वाशी आणि लायन्स क्लब नवी मुंबई यांच्या संयुक्त

नवी मुंबई : नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व पटावे याकरिता लोकमत माध्यम प्रायोजक आयोजित फोर्टीज रुग्णालय, वाशी आणि लायन्स क्लब नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी वाशी येथे झालेल्या रॅलीमध्ये ५०००हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, मुंबईचे डबेवाले, बाईकर्स, सायकलस्वार, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, समाजसेवक आणि फोर्टीज रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी, लायन्स क्लबचे विविध विभागीय सदस्य सहभागी झाले होते. वाशी सेंटर वन मॉलपासून सुरु झालेली या रॅलीचा वाशीतील सेक्टर १० परिसरात समारोप करण्यात आला.शरीरातील प्रत्येक अवयव किती महत्त्वाचा असतो आणि त्याशिवाय जगणे किती अवघड आहे हे नागरिकांना पटवून देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नागरिकांमध्ये अवयवदानासंबंधी जनजागृती करण्यात आली. लोकमत मीडिया प्रा.लि.चे सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांची प्रमुख उपस्थिती होती. या जनजागृती रॅलीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी, मुंबई डबावाला एज्युकेशन सेंटर तसेच मानसरोवर विद्यालय आणि ज्यु. कॉलेज, कामोठे, पिल्लई कॉलेज आॅफ आर्ट्स,कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स, घणसोली येथील टिळक एज्युकेशन सोसायटी आदींचा सहभाग होता. या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून लेक वाचवा, पाणी वाचवा, स्त्री भ्रूण हत्या थांबवा, स्वच्छ भारत, रक्तदान करा, डोळे दान करा असे अनेक संदेश देऊन समाजप्रबोधनाचेही उत्तम काम या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले. तरुणांनी सायकल, बाईक या वाहनांचा वापर करुन संदेश फलकातून जनजागृती केली.