शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नेरूळ-उरण मार्गाचा जुलैचा मुहूर्त हुकणार?

By admin | Updated: March 20, 2017 02:20 IST

सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. जुलै २0१७ पासून

नवी मुंबई : सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. जुलै २0१७ पासून पहिल्या टप्प्यातील खारकोपरपर्यंत प्रत्यक्ष लोकल सेवा सुरू करण्याचा सिडकोचा मानस आहे. असे असले तरी अंतिम टप्प्यातील उर्वरित कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. जुलै २0१७ चा मुहूर्त हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मानखुर्द-पनवेल व ठाणे-पनवेल या दोन रेल्वे प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या विकासाला मोठ्या प्रमाणात हातभार लागला आहे. या प्रकल्पात सिडकोचे मोठे योगदान राहिले आहे. या दोन मोठ्या प्रकल्पापाठोपाठ सिडकोने जुलै १९९७ मध्ये नेरूळ-उरण या २७ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु विविध कारणांमुळे हा प्रकल्प कागदावरच सीमित राहिला होता. असे असले तरी सिडकोच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येवून अखेर जून २0१२ पासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. सिडको व रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या या मार्गावर १0 स्थानके आहेत, तर या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १७८२ कोटी रुपये इतका आहे. हा प्रस्ताव तयार केला तेव्हा या प्रकल्पाचा खर्च केवळ १४१२ कोटी रुपये इतका निर्धारित करण्यात आला होता. या संपूर्ण मार्गावर चार उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यापैकी उलवे खाडीवरील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच या मार्गावरील सहाव्या क्रमांकाच्या खारकोपर स्थानकाचे कामही जवळजवळ पूर्ण होत आले आहे. शेवटच्या टप्प्यातील काही कामे प्रगतिपथावर आहेत. परंतु विविध कारणांमुळे ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत ती पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे. या पार्श्वभूमीवर नेरूळ-उरण मार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकल प्रवास आणखी काही महिने रखडण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. खारकोपरनंतरच्या मार्गाचे काम भूसंपादन, खारफुटी आणि इतर कारणांमुळे काही प्रमाणात रखडले आहे. असे असले तरी या अडथळ्यावर मात करण्यासाठी सिडको व रेल्वे विभागाकडून प्रयास सुरू आहेत. यातील बहुतांशी अडथळे दूर झाले आहेत. उर्वरित प्रश्नही लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर नेरूळ-उरण रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने होणे गरजेचे असल्याने पुढील एक दीड वर्षात या मार्गाचे उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे.