शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 06:48 IST

Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले उड्डाण २५ डिसेंबर अर्थात नाताळच्या दिवशी होणार आहे.

वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले उड्डाण २५ डिसेंबर अर्थात नाताळच्या दिवशी होणार आहे. महिनाभरापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले.  आता  ट्रॅव्हल्स  एजन्सीकडे तिकीट बुकिंगसाठी विचारणा करण्यात येत आहे.

फ्लाइट्सचे वेळापत्रकही प्रवाशांसाठी खूप सोयीस्कर असे ठेवले आहे. काही विमानांची उड्डाणे दररोज, तर काही फ्लाइट्स विशिष्ट दिवशीच असतील. सकाळपासून ते रात्रीपर्यंत विविध वेळांवर दिल्ली, गोवा आणि कोचीसाठी फ्लाइट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांना सोयीप्रमाणे फ्लाइटची निवड करता येणार आहे.

गोव्याच्या बुकिंगसाठी तब्बल १२ हजारांचे तिकीट दिसत होते. त्यानंतर ६ हजार ५०० ते ७ हजार ८०० असे एकेरी प्रवासासाठी दाखवत होते. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्या प्रवासासाठी अनेक जण उत्साही आहेत. हमीद अन्सारी, ट्रॅव्हल एजंट         नामकरणाचे काय?

विमानतळाला शेतकऱ्यांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही मागणी स्थानिकांची आहे. याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे ठराव पाठवून चार वर्षांचा कार्यकाळ लोटला आहे. उद्घाटनाप्रसंगी तरी दिबांच्या नावाबाबत घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र, तसेही झाले नाही. त्यामुळे दिबांच्या नामकरणाचा मुद्दा मागे पडला असून, लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का बसलेत, असा सवाल शेतकरी, प्रकल्पग्रस्त करत आहेत.

थेट हवाई सेवा कुठे?

- ‘अकासा एअर’च्या अधिकृत वेबसाइटनुसार २५ डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांच्या प्रवासी उड्डाणांना सुरुवात होणार आहे. नवी मुंबई विमानतळावरून ‘अकासा एअर’ दिल्ली तसेच गोवा, कोची आणि अहमदाबाद या चार शहरांसाठी थेट सेवा देणार आहे. 

- अनेकांनी अकासा एयरलाइन्सवर २५ डिसेंबरसाठी शनिवारी तिकीट बुकिंगचा प्रयत्न केला असता सुरुवातीच्या काळात तब्बल १२ हजार रुपये गोव्याचे दर दाखवत होते. त्यानंतर सहा हजार ३०० रुपयांचे दर दाखविण्यात आले. तर, इंडिगोच्या वेबसाइटवर हे दर सात हजार ८०० रुपये आहेत. 

- काही कंपन्यांनी तिकीट दर मोठ्या प्रमाणावर वाढविल्याचे दिसत आहे. ख्रिसमस आणि नववर्षात अनेक जण गोव्यामध्ये सुटी साजरी करण्यासाठी जातात. त्यादरम्यान विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू होणार असल्याने पनवेल, नवी मुंबईतील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. इंडिगो ही कंपनीही येथून विमानसेवा सुरू करणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Airport: Akasa Air connects to Delhi, Goa from Christmas.

Web Summary : Akasa Air starts Navi Mumbai flights Christmas to Delhi, Goa, Kochi, Ahmedabad. Locals want airport named after D.B. Patil; decision pending. Initial Goa fares high, now more reasonable. Indigo also to start services.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र