शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई मेट्रोकरिता विजेची स्वतंत्र व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:59 IST

बेलापूर ते पेंधर दरम्यान नवी मुंबई मेट्रो पुढील वर्षी धावणार असून, प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.

अरुणकुमार मेहत्रे ।कळंबोली : बेलापूर ते पेंधर दरम्यान नवी मुंबई मेट्रो पुढील वर्षी धावणार असून, प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, रोलिंग आणि आॅटो फेअर ही कामे अंतिम टप्प्यात असून, मेट्रोचे काही डबे चार महिन्यांपूर्वीच कारशेडमध्ये दाखल झाले आहेत. मेट्रोकरिता लागणाºया विजेची तरतूद करण्याचे काम महापारेषण कंपनीने हाती घेतले आहे. यासाठी खारघर सबस्टेशनमध्ये स्वतंत्र रोहित्र बसविण्याचे काम सुरू आहे.सिडकोने मे २०११मध्ये साडेचार हजार कोटी रु पये खर्चाच्या नवी मुंबई मेट्रोच्या कामाला सुरुवात केली. खरे तर हा प्रकल्प आतापर्यंत पूर्णत्वास येणे अपेक्षित होते; परंतु तांत्रिक अडचणींमुळे मेट्रो वेळेत धावली नाही. तळोजा पाचनंद येथील मेट्रोसाठी लागणाºया उड्डाणपुलाला मध्य रेल्वेकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे गेली काही वर्षे कामाची गती मंदावली होती. सिडकोने आता या ठिकाणी पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. मेट्रो मार्गाच्या खालून दिवा-पनवेल आणि मेल गाड्यांचा मार्ग आहे. हा उड्डाणपूल झाल्यानंतर जवळपास सर्व अडथळे दूर होणार आहेत.नवी मुंबई मेट्रो हा सिडकोचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एकूण ११ स्थानके या मार्गावर बांधण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर एका वेळी १४०० प्रवासी वाहतूक क्षमता असणार आहे, तसे नियोजन करण्यात आले आहे. तासी ८० कि.मी. नवी मुंबई मेट्रो धावणार असल्याने त्यानुसार यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. मेट्रोकरिता आवश्यक विजेसाठी महापारेषण कंपनीकडे प्रस्ताव आधीच सादर करण्यात आला असून, त्याकरिता लागणारा निधी सिडकोने उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार खारघर येथील महापारेषणच्या सबस्टेशनमध्ये ५० एमव्ही क्षमतेचे ट्रान्सफार्मर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ४००/२२० के. व्ही. क्षमता असणाºया या सबस्टेशनमधून ९४५ एमव्ही वीज पुरवली जाते. येथे आधीच दोन ट्रान्सफार्मर आहेत. आता आणखी ५० एमएव्हीचा ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार आहे. लवकरच हे काम पूर्णत्वास येणार आहे. येथून मेट्रो रेल्वेकरिता वीज दिली जाणारआहे. याशिवाय आगामी काळात सिडकोचे जे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहतील, त्यांनाही येथूनच वीज दिली जाणार आहे.