शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळ-उरण मार्गाला डिसेंबरचा मुहूर्त

By admin | Updated: July 7, 2017 06:44 IST

नेरुळ-उरण रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाने गती घेतली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत या मार्गावर खारकोपरपर्यंत प्रत्यक्ष लोकलसेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नेरुळ-उरण रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाने गती घेतली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत या मार्गावर खारकोपरपर्यंत प्रत्यक्ष लोकलसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी या मार्गाची चाचपणी करण्यात आली. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यातील लोकलसेवेसाठी यापूर्वी जुलैचा मुहूर्त देण्यात आला होता; परंतु विविध कारणांमुळे काम रखडल्याने आता डिसेंबर २0१७चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. मानखुर्द-पनवेल व ठाणे-पनवेल या दोन रेल्वे प्रकल्पांमुळे नवी मुंबईच्या विकासाला मोठ्या प्रमाणात हातभार लागला आहे. या प्रकल्पात सिडकोचे मोठे योगदान राहिले आहे. या दोन मोठ्या प्रकल्पांपाठोपाठ सिडकोने जुलै १९९७मध्ये नेरुळ-उरण या २७ कि.मी. लांबीच्या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव तयार केला होता; परंतु विविध कारणांमुळे हा प्रकल्प कागदावरच सीमित राहिला होता. असे असले तरी सिडकोच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येऊन, अखेर जून २0१२पासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. सिडको व रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या या मार्गावर १0 स्थानके आहेत, तर या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १७८२ कोटी रुपये इतका आहे. हा प्रस्ताव तयार केला, तेव्हा या प्रकल्पाचा खर्च केवळ १४१२ कोटी रुपये इतका निर्धारित करण्यात आला होता. या संपूर्ण मार्गावर चार उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी उलवे खाडीवरील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या या मार्गावरील पाचव्या क्रमांकाच्या खारकोपर स्थानकाचे काम पूर्ण होत आले आहे. शेवटच्या टप्प्यातील काही कामे प्रगतिपथावर आहेत; परंतु विविध कारणांमुळे ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे जुलैचा मुहूर्त टळल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले, तरी पुढील पाच महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण करून डिसेंबरमध्ये खारकोपरपर्यंत लोकलसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वेने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी रेल्वेकडून खारकोपरपर्यंतच्या मार्गाची चाचपणी करण्यात आली.दुसऱ्या टप्प्याला भूसंपादनाचा अडथळानेरुळ-उरण या मार्गावर एकूण १0 रेल्वेस्थानके आहेत. यात सीवूड, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर या पहिल्या टप्प्यातील पाच स्थानकांची कामे पूर्णत्वास आली आहेत. त्यापुढील गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, डोंगरी व उरण या पाच स्थानकांचे काम भूसंपादन व इतर कारणांमुळे रखडले आहे. या संपूर्ण मार्गावर १५ ठिकाणी भुयारीमार्ग, तर ७८ छोट्या नाल्यांचा समावेश आहे.