शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगारांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 04:28 IST

भाजी मार्केट सुरळीत सुरू; धान्य, मसालासह कांदा मार्केटमध्ये शुकशुकाट

नवी मुंबई : प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माथाडी कामगारांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबई बाजार समितीमधील भाजी मार्केटमधील व्यवहार सुरळीत सुरू होते. कांदा, मसाला व धान्य मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदवरून माथाडी नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले.राज्यातील माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. माथाडी बोर्डांची पुनर्रचना करण्यात यावी. बोर्डांवर पूर्ण वेळ अध्यक्ष व सचिवांची नियुक्ती करण्यात यावी. कर्मचारी भरती करण्यात यावी, घरांसह पतसंस्था, रुग्णालय व इतर प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या मुख्य संघटनेने २६ फेब्रुवारीला राज्यव्यापी बंदचे आयोजन केले होते.यापूर्वी माथाडी संघटनेने बंद पुकारल्यानंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात यायचा; परंतु या वेळी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील व कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यामध्ये आंदोलनावरून एकवाक्यता दिसली नाही. यामुळे बंद असूनही भाजी मार्केट सुरळीत सुरू होते. भाजी मार्केटमध्ये ५८४ वाहनांची आवक झाली असून, २५७ वाहनांमधून माल विक्रीसाठी मुंबईत गेला. फळ मार्केटमध्ये १५८ वाहनांची आवक झाली व ७४ वाहनांमधून माल विक्रीसाठी मुंबईत गेला. फळ मार्केटमध्ये दुपारनंतर व्यवहार बंद करण्यात आले.मसाला, धान्य व कांदा या तीन मार्केटमधील व्यवहार जवळपास ठप्प होते. रेल्वे धक्का व इतर ठिकाणचे व्यवहारही बंद ठेवण्यात आले होते. पुणे, नाशिक, सातारा व इतर काही जिल्ह्यांमधील काही मार्केटही बंद ठेवण्यात आली होती.माथाडी कामगारांनी पुकारलेल्या बंदची दखल शासनाने घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयामध्ये तातडीची बैठक आयोजित केली असून, त्या बैठकीमध्ये माथाडींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. कामगारांनी पुकारलेल्या बंदला भाजीपाला मार्केट वगळता इतर ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला.- नरेंद्र पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनमाथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवारी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी चर्चा करून दोन महिन्यांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बैठकीचे आयोजन केले असून, सरकारकडून कामगारांचे सर्व प्रश्न सोडवून घेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.- शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीStrikeसंप