शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मकरसंक्रांतीचा मुहूर्त चुकला; अलिबागचा हापूस वाशीत पाेहोचला, पहिली पेटी मार्केटमध्ये रवाना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 05:59 IST

शुक्रवारी बाजारात आलेल्या हापूस आंब्याच्या पेटीची पूजा करण्यात आली. दरवर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हापूस बाजारात पाठविला जातो

रायगड : अलिबागमधील हापूस आंब्यांची पहिली पेटी नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये रवाना झाला आहे. निसर्गाच्या हेलकाव्यामुळे अलिबागचा हापूस उशिरा आल्याने संक्रांतीचा मुर्हूत मात्र हुकला आहे.

तालुक्यातील हाशिवरे येथील बागायतदार डॉ.संदेश पाटील यांनी दोन डझन हापूस आंब्यांच्या सहा पेट्या वाशी एमपीएमसी फ्रूट मार्केटमधील व्यापारी रवींद्र जाधव, ऋषिकेश जाधव यांना विक्रीसाठी पाठविल्या आहेत. हंगामातील पहिला आंबा हा मुहूर्ताचा आंबा मानला जातो. त्यामुळे या आंब्याची विधिवत पूजा करून ‘पूर्ण हंगाम चांगला जाऊ दे’ अशी प्रार्थनाही केली जाते. अगदी पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आजही जपली जाते.

शुक्रवारी बाजारात आलेल्या हापूस आंब्याच्या पेटीची पूजा करण्यात आली. दरवर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हापूस बाजारात पाठविला जातो. यंदा मात्र खराब हवामान, अवकाळी पाऊस याचा फटका बसल्याने संक्रांतीचा मुहूर्त चुकला हाेता. थोडा उशिराने जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात हापूस बाजारात दाखल झाला असल्याचे बागायतदार डॉ.संदेश पाटील यांनी सांगितले, तसेच हा मुहूर्ताचा आंबा असल्याने या आंब्याचे दर ठरविण्यात आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वर्षी आंब्याचे उत्पादन कमीच राहणार आहे. वादळात झाडांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्याचबराेबर, खराब हवामान, अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. त्याचा आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मुहूर्ताचा आंबा बाजारात आला असला, तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरू व्हायला उशीर लागणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये २५ ते ३० टक्के हापूस आंबा विक्रीसाठी बाजारात दाखल होतो. यंदा मात्र हे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Mangoआंबा