शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, उपमहापौरांची दालनाची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:58 IST

पनवेल : पनवेल शहर महानगरपालिकेची निवडणूक होऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत, तरीही महापौर, उपमहापौरांच्या दालनाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. निवडून आलेल्या सदस्यांना सभागृहात बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने निकालानंतर महिन्याभराचा कालावधी उलटला तरी महापौर, उपमहापौराची निवडणूक झाली नव्हती. अखेर १० जून रोजी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर, उपमहापौरांच्या निवडीसाठी ...

पनवेल : पनवेल शहर महानगरपालिकेची निवडणूक होऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत, तरीही महापौर, उपमहापौरांच्या दालनाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. निवडून आलेल्या सदस्यांना सभागृहात बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने निकालानंतर महिन्याभराचा कालावधी उलटला तरी महापौर, उपमहापौराची निवडणूक झाली नव्हती. अखेर १० जून रोजी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर, उपमहापौरांच्या निवडीसाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर पनवेल महापालिकेच्या महापौरपदी डॉ. कविता चौतमोल तर उपमहापौरपदी चारु शीला घरत यांची निवड करण्यात आली. मात्र, अद्याप महापौर, उपमहापौरांना बसण्यासाठी दालनच नसल्याने विकासकामे होणार कशी, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. महापालिकेच्या नव्याने बांधण्यात येणाºया इमारतीत महापौर, उपमहापौरांच्या दालनाचे काम सुरू आहे. याकरिता पालिकेने ६६ लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. महापौर, उपमहापौर यांच्याव्यतिरिक्त विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, सभापती, स्थायी समिती सभापती आदींच्या दालनांची कामे या इमारतीच्या पहिल्या व दुसºया मजल्यावर सुरू आहेत. निवडणूक होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून देखील दालनांची कामे अपूर्ण असल्याने महानगर पालिका प्रशासन व कार्यपद्धतीवर टीका होत आहे. महापौरांचे दालन तयार करण्यास दोन महिने लागत असतील तर सर्वसामान्यांची कामे कधी होणार, असा प्रश्न पनवेलकरांकडून विचारण्यात येत आहे. पनवेलला स्मार्ट सिटी बनविण्याचे ध्येय असलेल्या पालिकेला दोन महिन्यांत शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचे दालन अद्याप बनवता आलेले नाही. वास्तविक पाहता निवडणुकीपूर्वीच ही सर्व दालने तयार होणे गरजेचे होते. मात्र, कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे अद्यापही सर्व दालनांचे काम रखडले आहे. सध्याच्या घडीला पनवेल नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीत पहिल्या मजल्यावर महापौर, उपमहापौरांना तात्पुरत्या स्वरूपात दालन पालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  

  • असे आहे दालन

महापौरांकरिता दुसºया मजल्याचा ३५० चौरस फुटांचे दालन तयार करण्यात आले. त्याचबरोबर ११०चौ. फू. अ‍ॅण्टी चेंबर आहे. ३५० चौ. फूट क्षेत्रफळाचा मिटिंग हॉल बनविण्यात आला आहे. त्यांच्या स्वीय सहायकासाठी ८० चौ. फुटाची केबिन आहे.