शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

गळतीमुळे लोकल प्रवासी हैराण

By admin | Updated: June 30, 2017 03:03 IST

पावसाचे आगमन झाले असून, शहरातील लोकलसेवेला गळतीची धार लागली आहे. नवी मुंबईतील हजारो प्रवासी हार्बर, तसेच

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पावसाचे आगमन झाले असून, शहरातील लोकलसेवेला गळतीची धार लागली आहे. नवी मुंबईतील हजारो प्रवासी हार्बर, तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर रोजचा प्रवास करतात. मात्र, या प्रवाशांना पावसाळा सुरू होताच गळतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने प्रशानला अनेकदा तक्रार करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या फलाटांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. निकामी खिडक्या, रेल्वेची नादुरुस्त दरवाजे, मोडक्या आसन व्यवस्था, फलाटांवरील छतांमधून गळणारे पाणी यामुळे प्रवाशांनी कसा प्रवास करायचा? असा प्रश्न नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकांची डागडुजी करण्याविषयी सिडको आणि प्रशासनाच्या टोलवा टोलवीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सीबीडी, नेरुळ, सानपाडा, तुर्भे, घणसोली तसेच खारघर, खांदेश्वर, पनवेल आदी रेल्वेस्थानकांमध्ये लोकलची वाट पाहत उभ्या प्रवाशांना गळक्या छतांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इंडिकेटर बंद पडल्याने लोकलची वेळ कळत नसून, पावसामुळे येणारी लोकल किती मिनिटे उशिरा येणार, याबाबतही सूचना दिल्या जात नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. सानपाडा रेल्वेस्थानकातील फलाटांवरही गळतीचे प्रमाण वाढले असून, फलाटांवर घसरून पडण्याचा प्रकार पाहायला मिळतात. रेल्वेस्थानकातील भुयारी मार्गातही पाणी साचत असून, अनेक वेळा या ठिकाणी असलेले दिवेदेखील बंद असतात.