शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशनचे काम अंतिम टप्प्यात

By admin | Updated: August 26, 2015 00:19 IST

सुधारित भाडेवाढीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रिक्षा मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून या कामाने वेग घेतला असून रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया जवळजवळ

नवी मुंबई : सुधारित भाडेवाढीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रिक्षा मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून या कामाने वेग घेतला असून रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया जवळजवळ अंतिम टप्प्यात आली आहे. असे असले तरी रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया पूर्णत: सदोष असल्याचे काही प्रकरणातून समोर आले आहे. वैधमापनशास्त्र विभागामार्फत मीटर रिकॅलिब्रेशन केले जात आहे. नवी मुंबईत एकूण १०,२०० अधिकृत रिक्षा आहेत. त्यापैकी आतापर्यंत ८६०० रिक्षा मीटरचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होईल, असा विश्वास संबंधित विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, रिकॅलिब्रेशन केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी त्यात त्रुटी असल्याच्या रिक्षाचालकांच्या तक्रारी आहेत. योग्यरीत्या रिकॅलिब्रेशन न झाल्याने रिक्षाचालकांना ही प्रक्रिया पुन्हा करावी लागत आहे. त्याचा नाहक भुर्दंड संबंधित रिक्षाचालकांना सहन करावा लागत आहे. आतापर्यंत अशाप्रकारच्या चाळीस ते पन्नास तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यासंदर्भात संबंधित विभागाला माहिती देण्यात आल्याचे रिक्षा महासंघाचे अध्यक्ष कासम मुलाणी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)