शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएलची अंतिम यादी रखडली

By admin | Updated: January 4, 2016 02:46 IST

सरकारच्या दिरंगाईमुळे कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील दारिद्रयरेषेखालील कुटुंबांची अंतिम यादी गेल्या दहा वर्षांपासून प्रसिद्ध झालेली नाही.

मुरलीधर भवार ,  कल्याणसरकारच्या दिरंगाईमुळे कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील दारिद्रयरेषेखालील कुटुंबांची अंतिम यादी गेल्या दहा वर्षांपासून प्रसिद्ध झालेली नाही. यासंबधी महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, लवकरच यादी प्रसिद्ध केली जाईल. तिचे काम सुरू आहे, अशी सरकारी छापाची उत्तरे वेळोवेळी दिली जातात. त्यामुळे दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागणार, असे दिसत आहे. सहायक प्रकल्प अधिकारी सारिका परदेशी यांनी सांगितले की, यादीला दिरंगाई नगरपरिषद संचालकांकडून झालेली आहे. त्यांच्याकडून मान्यता आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. यादीसाठीचे सर्वेक्षण सुवर्ण जयंतीसाठी करण्यात आले होते. आता राष्ट्रीय नागरी उपजीविका ही योजना नव्याने आली आहे. त्यात ७५ टक्के अर्थसाहाय्य दारिद्रयरेषेखालील कुटंबांना केले जाणार आहे. २५ टक्के अर्थसाहाय्य अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, अपंग यांना केले जाणार आहे. महापालिका हद्दीत ६०० महिला बचत गट आहेत. त्यापैकी ३५० महिला बचत गट सक्रिय आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांकडून सात टक्के व्याजदराने बचत गटांना कर्जपुरवठा केला जातो. त्यापैकी ३ टक्के रक्कम बँका परत करतात. प्रत्यक्षात हे कर्ज बचत गटांना ४ टक्के दराने पडते. २५ आॅगस्ट २०१४ पासून नव्या योजनेचे काम सुरू झाले आहे. महिला बचत गटासाठी १० सदस्य संख्येची अट असल्याने नव्याने ३० बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. स्वयंरोजगारासाठी १८० अर्ज कर्जासाठी प्राप्त झालेले असून त्यापैकी ६५ प्रकरणे मंजूर झालेली आहेत. महिला बचत गटांसाठी ४२ प्रकरणे आली असून त्यापैकी १२ मंजूर झालेली आहेत. कर्जाची मर्यादा ही १० लाखांची असली तरी महिला बचत गट १० लाखांचा व्यवसाय उभारू शकत नाही. त्यामुळे अडीच ते तीन लाख रुपये कर्जाची मर्यादा आहे. बँकाही इतक्याच रकमेचे कर्ज मंजूर करतात. अनेक महिला बचत गटांत कलह निर्माण झाल्यावर त्याचा परिमाण कर्ज परतफेडीवर होतो. नव्या राष्ट्रीय नागरी उपजीविका योजनेसाठी दारिद्रयरेषेच्या यादीचा उपयोग होणार नाही. सरकारने आर्थिक जातनिहाय जनगणना केली आहे. या जनगणना यादीचा उपयोग केला जाणार आहे.