शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रातील ‘लक्ष्मी’ नवी मुंबईमध्ये दाखल

By admin | Updated: November 2, 2015 01:41 IST

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून फराळ, फटाके, आकाशकंदील, रंग - रांगोळी, आकर्षक दिवे-पणत्यांनी बाजारपेठा सजू लागल्या आहेत.

प्रशांत शेडगे, पनवेलदिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून फराळ, फटाके, आकाशकंदील, रंग - रांगोळी, आकर्षक दिवे-पणत्यांनी बाजारपेठा सजू लागल्या आहेत. दिवाळीत लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस असून, या दिवशी घरात लक्ष्मीचा वास असावा म्हणून झाडू-झाडणीची पूजा केली जाते. यंदा आंध्र प्रदेशमधील ३० कारागीर जवळपास ७० हजार झाडण्या घेऊन पनवेल परिसरातील गावागावात विक्री करण्यासाठी दाखल झाले आहेत. दिवाळी म्हटले की आनंद आणि उत्साहाची पर्वणी. फटाके, नवीन कपडे आणि गोडधोड फराळ यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होतो. दिवाळीची चाहूल लागताच घराच्या साफसफाई, रंगरंगोटीला सुरुवात होते. दीपावलीत प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे असून, लक्ष्मीपूजनाला झाडणीची पूजा करण्याची परंपरा आहे. घर स्वच्छ ठेवणारी, घरातील लक्ष्मी म्हणून झाडणीची पूजा केली जाते. महाराष्ट्रातील बारा बलुतेदारी मागे पडल्याने आता पारंपरिक व्यवसाय लोप पावू लागले आहेत. पूर्वी विशेषकरून मातंग समाजाचे लोक झाडणी तयार करीत. आता हा व्यवसाय इतिहासजमा होऊ लागला आहे. त्यामुळे यंदा आंध्र प्रदेशातील ३० जण जवळपास ७० हजार झाडण्या घेऊन पनवेल परिसरात दाखल झाले आहेत.खजुराच्या पानापासून या झाडण्या तयार करण्यात येतात. लहान आणि मोठ्या अशा दोन प्रकारांत तयार करण्यात येणाऱ्या या झाडण्यांची किंमत १० ते २० रुपये इतकी आहे. एरवी ही मंडळी शेतमजुरी, रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. मात्र दिवाळीच्या मोसमात महाराष्ट्रात चांगला व्यवसाय असल्याने ते झाडणी बनविण्याचा आपला पारंपरिक व्यवसाय करतात.