शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

खारघर रेल्वे स्थानक सापडले समस्यांच्या गर्तेत; प्रवाशांची होतेय गैरसोय, सातपैकी एकच तिकीट खिडकी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 04:51 IST

- वैभव गायकर पनवेल : खारघर रेल्वे स्थानक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. एकीकडे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असताना प्रवाशांच्या ...

- वैभव गायकर

पनवेल : खारघर रेल्वे स्थानक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. एकीकडे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असताना प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या तिकीट खिडक्या मात्र दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. सध्याच्या घडीला या ठिकाणी सातपैकी केवळ एकच तिकीट खिडकी सुरू असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.विशेष म्हणजे, अपंगासाठी राखीव असलेली तिकीट खिडकीही बंद असल्याने अपंग प्रवाशांनाही सामान्य प्रवाशांच्या रांगेत उभे राहून आपले तिकीट घ्यावे लागत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. नागरिकांना कॅशलेस सेवेसाठी उपकृत करण्यात आले. मात्र, केंद्र सरकारच्या अखत्यारितच येणाऱ्या रेल्वे मंत्रालयाच्या या विभागात कार्ड पेमेंट बंद असल्याचा बोर्ड खारघर रेल्वे स्थानकांच्या तिकीट खिडकीवर लावण्यात आला आहे.खारघर रेल्वे स्थानकावरून दररोज ६० हजार पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असतात, अशा वेळी सातपैकी केवळ एकच तिकीट खिडकी सुरू ठेवणे हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न प्रवासी संघटना विचारत आहेत. सध्याच्या घडीला सर्वत्र स्वच्छ सर्वेक्षण २०२० सुरू असताना खारघर रेल्वे स्थानकातील दुर्गंधी, येथील शौचालयात अस्वच्छता पाहता रेल्वे प्रशासनालाच स्वच्छ सर्वेक्षणाचे महत्त्व नाही, असे चित्र या ठिकाणी पाहवयास मिळत आहे. रेल्वे स्थानकाच्या आतमध्ये भिकाऱ्यांनी बस्तान मांडले आहे. तरीदेखील रेल्वे प्रशासन सुस्त बसले आहे.खारघर रेल्वे स्टेशनची उभारणी सिडकोच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मात्र, अल्पावधीतच संपूर्ण स्थानकाची दुरवस्था झाली आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षखारघर रेल्वे स्थानकातील समस्यांसंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. मागील वर्षभरापासून शहरातील एकाही लोकप्रतिनिधीने या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनातील अधिकाºयांची भेट घेतलेली नाही.प्रवासी संघटना घेणार रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांची भेटखारघर रेल्वे स्थानकातील विविध समस्यांच्या तक्रारी आमच्याकडे प्रवाशांनी केलेल्या आहेत. यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे पनवेल प्रवासी संघाचेडॉक्टर भक्तिकुमार दवे यांनी सांगितले.सरकता जिनादेखील बंदचखारघर रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावर स्कायआॅकवर चढण्यासाठी सिडकोने उभारलेला सरकत जिनाही अनेक दिवसांपासून बंद आहे, यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :ticketतिकिट